शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रोनाल्डोचा तो गोल ठरला ' Goal of the season'; ज्यांच्याविरुद्ध गोल केला त्यांनीच केले कौतुक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 09:42 IST

जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डो याच्या शिपरेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. २०१७-१८ च्या सत्रात रेयाल माद्रिदला विक्रमी सलग तिसरे चॅम्पियन्स लीग जेतेपद पटकावून देण्यात रोनाल्डोने सिंहाचा वाटा उचलला होता.

माद्रिद - जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डो याच्या शिपरेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. २०१७-१८ च्या सत्रात रेयाल माद्रिदला विक्रमी सलग तिसरे चॅम्पियन्स लीग जेतेपद पटकावून देण्यात रोनाल्डोने सिंहाचा वाटा उचलला होता. त्याने चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत केलेल्या गोलने रेयालचे आव्हान कायम राखले होते आणि त्याच्या याच गोलला चॅम्पियन्स लीगच्या २०१७-१८ मोसमातील सर्वोत्तम गोलचा पुरस्कार मिळाला आहे. रोनाल्डो सध्या युव्हेंटस क्लबचे प्रतिनिधित्व करत आहे आणि त्याने रेयालकडून खेळताना याच क्लबविरुद्ध गोल केला होता. नऊ फूट हवेत झेपावत रोनाल्डोने घेतलेली ती कोलांटीउडी सर्व वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर जागा व्यापणारी ठरली. त्या गोललाच ' Goal of the season' चा पुरस्कार मिळाला. कसा केला होता गोल पाहा हा व्हिडीओ... या पुरस्कार निवडीसाठी झालेल्या मतदानात ३४६९१५ मतांपैकी २ लाख मत रोनाल्डोच्या बाजूने पडली. युव्हेंटस क्लबचा सहकारी मारियो मॅंडझूकीचने गत मोसमात रेयाल माद्रिदविरुद्ध अंतिम लढतीत केलेला गोल सर्वोत्तम ठरला होता. रोनाल्डोचा कट्टर प्रतिस्पर्धी बार्सिलोनाचा लिओनेल मेस्सी याने २०१४-१५ व २०१५-१६ च्या मोसमात हा पुरस्कार जिंकला आहे. पाचवेळा बॅलोन डी'ओर हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणाऱ्या रोनाल्डोने ' Goal of the season' साठी निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. तो म्हणाला,' मला मत देणारे प्रत्येकाचे आभार. तो क्षण मी केव्हाच विसरू शकत नाही. विशेषतः प्रेक्षकांकडून मिळालेली दाद.. ' 

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉल