शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिस्तियानो रोनाल्डोने ३२० मिनिटांनी नोंदवला पहिला गोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 08:59 IST

ख्रिस्तियानो रोनाल्डोला 'सीरि A ' या इटालियन फुटबॉल लीगमधील गोलदुष्काळ ३२० मिनिटानंतर  संपवण्यात यश आले. त्याने रविवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात सॅसौलो क्लबविरुद्ध दुसऱ्या सत्रात दोन गोल केले.

मुंबई : ख्रिस्तियानो रोनाल्डोला 'सीरि A ' या इटालियन फुटबॉल लीगमधील गोलदुष्काळ ३२० मिनिटानंतर  संपवण्यात यश आले. त्याने रविवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात सॅसौलो क्लबविरुद्ध दुसऱ्या सत्रात दोन गोल केले. इटालियन लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या रोनाल्डोने या लढतीपूर्वी गोल करण्यासाठी २७ प्रयत्न केले, परंतु त्याला यश मिळाले नव्हते. गतविजेत्या युव्हेंटसने रोनाल्डोच्या या कामगिरीच्या जोरावर २-१ असा विजय मिळवला. दुसऱ्या सत्रातील पाच मिनिटांनी पाऊलो डिबालाच्या पासवर रोनाल्डोने सीरि ए लीगमधील पहिला गोल केला. या गोलनंतर बऱ्याच कालावधीनंतर रोनाल्डोचा आनंद साजरी करण्याची स्टाईल पाहायला मिळाली. पहिल्या गोलसाठी पोर्तुगालच्या कर्णधाराला ४ सामने, ३२० मिनिट, २७ प्रयत्न प्रतीक्षा करावी लागली. रोनाल्डोच्या गोल करण्याच्या क्षमतेवर शंका उपस्थित केली जाऊ लागली होती. पण त्याने १५ मिनिटांच्या आत दुसरा गोल करून त्याची गोल्सची भूक संपली नसल्याचा इशारा दिला. पाचवेळा बॅलोन डी ओर पुरस्कार जिंकणाऱ्या रोनाल्डोला हॅटट्रिक करता आली नाही. सॅसौलोचा गोलरक्षक अँड्री कोंसिग्लीने त्याचा प्रयत्न अडवला. भरपाई वेळेत सॅसौलोच्या खोउमा बॅबकरने गोल केला. दरम्यान, युव्हेंटसच्या डॉगलस कोस्टाला प्रतिस्पर्धीवर थुंकल्यामुळे रेड कार्ड दाखवण्यात आले.

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉल