शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रोनाल्डोने बनवल्या होत्या बनावट कंपन्या, आता भरावा लागतोय 152 कोटींचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 21:31 IST

रोनाल्डोने माझ्यावर बलात्कार केला होता, असा आरोप अमेरिकेच्या कॅथरीन मायोरगाने केला आहे.

नवी दिल्ली : ख्रिस्तियानो रोनाल्डो हा सर्वश्रूत असाच दिग्गज फुटबॉलपटू. अनेक जणांच्या गळ्यातील तो ताइत आहे. त्याने आतापर्यंत बऱ्याचदा आपल्या खेळाच्या जोरावर चाहत्यांचे मने जिंकली आहेत. पण आता अशी एक बातमी प्रसिद्ध झाली आहे की, याच रोनाल्डोने बनावट कंपन्या बनवल्या होत्या. या बनावट कंपन्या बनवून तो आपली कमाई टॅक्स भरावा लागू नये, म्हणून लपवत होता. पण आता याप्रकरणी रोनाल्डो दोषी ठरला आहे.

 

कर चोरी केल्याप्रकरणी रोनाल्डो दोषी ठरला आहे. 2011 ते 2014 या कालावधीमध्ये रोनाल्डोने 14.7 मिलियन युरोचा टॅक्स लपवला होता, हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे रोनाल्डोला आता कडक शिक्षा करण्यात आली आहे. रोलाल्डोला 23 महिन्यांची कैद व्हावी, असा निकाल न्यायालयाने दिला होता. पण आता रोनाल्डोला 23 महिने कैद होणार नाही, त्यासाठी त्याला 18.8 मिलियन युरो (म्हणजेच 152 कोटी रुपये) एवढा दंड भरावा लागणार आहे.

रोनाल्डोवर यापूर्वी बलात्काराचा आरोपही लावण्यात आला होता. रोनाल्डोने माझ्यावर बलात्कार केला होता, असा आरोप  अमेरिकेच्या कॅथरीन मायोरगाने केला आहे. ही घटना 2009 साली घडल्याचे कॅथरीनने सांगितले होते. 2009 साली लास वेगास येथील एका हॉटेलमध्ये रोनाल्डोने माझ्यावर बलात्कार केला होता, असा आरोप कॅथरीनने केला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या अमेरिकेचे पोलीस करत आहेत.

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉल