शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा मँचेस्टर युनायटेडच्या ताफ्यात, तीन वर्षांत युव्हेंट्स क्लब सोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 21:46 IST

ख्रिस्तियानो रोनाल्डोनं इंग्लिश प्रीमिअर लीगमधील मँचेस्टर सिटी क्लबला चकवा देत जुना क्लब मँचेस्टर युनायटेडच्या ताफ्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला.

ख्रिस्तियानो रोनाल्डोनं इंग्लिश प्रीमिअर लीगमधील मँचेस्टर सिटी क्लबला चकवा देत जुना क्लब मँचेस्टर युनायटेडच्या ताफ्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला. पोर्तुगालच्या सुपरस्टार फुटबॉलपटूनं इटालियन क्लब युव्हेंटससोबतचा करार शुक्रवारी संपुष्टात आणला ( Cristiano Ronaldo sealed a sensational return to Manchester United as he joined the Premier League club on Friday, ending his time with Serie A giant Juventus) 

३६ वर्षीय रोनाल्डोनं २००३ ते २००९ या कालावधीत मँचेस्टर युनायटेडसाठी २९२ सामन्यांत ११८ गोल्स केले आहेत आणि आताचा त्याचा निर्णय म्हणजे तो पुन्हा स्वगृही परतत आहे. शुक्रवारी दिवसभर रोनाल्डो नेमक्या कोणत्या क्लबमध्ये जाणार याची चर्चा सुरू होती. यात मँचेस्टर सिटीचे नाव आघाडीवर होते, परंतु त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी युनायटेडनं  कुरघोडी केली अन् अखेरच्या क्षणाला पाच बॅलोन डी ओर पुरस्कार जिंकणाऱ्या रोनाल्डोला आपल्या ताफ्यात घेतले.  मँचेस्टर युनायटेडनं म्हटलं की,''युव्हेंटस क्लबकडून रोनाल्डोला आमच्या संघात घेण्याचा आम्हाला आनंद होत आहे. आता फक्त काही पेपरवर्क बाकी आहेत.  

रोनाल्डोनं २०१८ साली ला लिगा क्लब रेयाल माद्रिदसोबतचा ९ वर्षांचा प्रवास संपवून युव्हेंटसच्या ताफ्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यानं तीन वर्षांत इटालियन क्लबकडून १३४ सामन्यांत १०१ गोल्स केले. रेयाल माद्रिदकडून खेळताना रोनाल्डोनं चार चॅम्पियन्स लीग जेतेपदं आणि दोन ला लिगा ट्रॉफी जिंकल्या. त्याच्या नावावर ३० मोठ्या स्पर्धांची जेतेपदं आहेत. त्यात पाच चॅम्पियन्स लीग, चार फिफा क्लब वर्ल्ड कप, सात इपीएल, स्पेन व इटली येथील जेतेपदं आणि पोर्तुगालकडून एक युरो चषक यांचा समावेश आहे.  

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोEnglandइंग्लंड