शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Video: रेफ्रीला धक्का देणा-या ख्रिस्तियानो रोनाल्डोवर पाच सामन्यांची बंदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 14:57 IST

स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी बार्सिलोना क्लबविरुद्धच्या पहिल्या लीग लढतीत रोनाल्डोने सामनाधिकाऱ्यांना जोरदार धक्का दिला.

ठळक मुद्देरिअल माद्रिद फुटबॉल क्लबचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्यावर पाच सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. पोर्तुगलचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डोवर रेफ्रीला धक्का दिल्यामुळे पाच सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी बार्सिलोना क्लबविरुद्धच्या पहिल्या लीग लढतीत रोनाल्डोने सामनाधिकाऱ्यांना जोरदार धक्का दिला.

माद्रिद, दि. 15 - रिअल माद्रिद फुटबॉल क्लबचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्यावर पाच सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. पोर्तुगलचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डोवर रेफ्रीला धक्का दिल्यामुळे पाच सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. रॉयल स्पॅनिश फुटबॉल महासंघाने ही बंदी घातली आहे. 

स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी बार्सिलोना क्लबविरुद्धच्या पहिल्या लीग लढतीत रोनाल्डोने सामनाधिकाऱ्यांना जोरदार धक्का दिला. त्यामुळे त्याच्यावर ही बंदीची कारवाई करण्यात आली. या सामन्यात गोल केल्यानंतर रोनाल्डोने  टी-शर्ट काढून आनंद व्यक्त केला होता. त्यावेळीही त्याला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. मात्र, नंतर रेफ्रीला धक्का दिल्यामुळे रेड कार्ड दाखवून त्याला मैदानाबहेर काढण्यात आले. रेड कार्ड दाखवण्यात आल्यामुळे त्याच्यावर एका सामन्यांची बंदी होतीच आणि त्यात चार सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. या बंदीबरोबरच रोनाल्डोला 4 हजार 500 अमेरिकन डॉलरचा दंडही भरण्यास सांगितला आहे.

बार्सिलोना क्लबविरुद्धच्या पहिल्या लीग लढतीत रोनाल्डोने रेफ्री रिकाडरे डी बगरेस बेंगोएत्जी यांच्या निर्णयावर नाराज होऊन त्यांना धक्का दिला होता. त्यामुळे त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली. या निर्णयाविरोधात रोनाल्डो दहा दिवसांत दाद मागू शकतो. दाद मागूनही रोनाल्डोवरील बंदी कायम राहिल्यास त्याला पुढच्या चार सामन्यांना मुकावं लागणार आहे.  या सामन्यात रोनाल्डोच्या संघाने 3-1 असा विजय मिळवला आहे. मात्र, बंदी उठली नाही तर परतीच्या लढतीत रिअल माद्रिदला रोनाल्डोशिवाय खेळावे लागणार आहे.