सोची : स्पेनचे प्रशिक्षक फर्नांडो हियेरो यांनी डिएगो कोस्टा याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. पोर्तुगालविरुद्ध काल झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत त्याने शानदार कामगिरी केली, असे त्यांनी म्हटले. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या लढतीत डिएगो कोस्टा याने २ गोल केले. पोर्तुगाल व स्पेन यांच्यातील सामना ३-३ असा बरोबरीत राहिला. ब्राझीलमध्ये २0१४ मध्ये झालेल्या विश्वचषकात कोस्टा संघासोबत सामंजस्य बसवू शकण्यात अपयशी ठरल्याने स्पेनची कामगिरी निराशाजनक झाली होती. प्रशिक्षक फर्नांडो यांनी कालच्या सामन्यात माद्रिदच्या या खेळाडूला खेळविण्याचा निर्णय घेतला आणि कोस्टाने त्यांना निराश केले नाही. विशेष म्हणजे संघ पिछाडीवर असताना कोस्टाने दोन गोल केले. हियेरो म्हणाले, की हा असा सामना होता त्यात कोस्टा आम्हाला मदत करू शकतो असे आम्हाला वाटले. त्याने शानदार खेळ केला.’ कोस्टाने सामन्याच्या २४ व्या मिनिटाला पोर्तुगालच्या तीन डिफेंडरला चकविताना गोल केला.
कोस्टाने शानदार कामगिरी केली : प्रशिक्षक हियेरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 03:25 IST