बाई अवबाई पेटिट संघ उपांत्य फेरीत, युथ स्पोर्टस  फुटबॉल; फादर अ‍ॅग्नेलचीही कूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 04:57 AM2017-11-27T04:57:23+5:302017-11-27T04:57:47+5:30

बाई अवबाई पेटिट गर्ल्स हायस्कूल आणि फादर अ‍ॅग्नेल मल्टिपर्पज स्कूल अ‍ॅण्ड ज्यूनिअर कॉलेज या संघांनी आपली विजयी घोडदौड कायम राखताना युथ स्पोटर््स फुटबॉल स्पर्धेच्या मुलींच्या गटाची उपउपांत्य फेरी गाठली.

 Bai Avabai Petit Sangh in the semifinals, Youth Sports Football; The journey of Father AğNAL | बाई अवबाई पेटिट संघ उपांत्य फेरीत, युथ स्पोर्टस  फुटबॉल; फादर अ‍ॅग्नेलचीही कूच

बाई अवबाई पेटिट संघ उपांत्य फेरीत, युथ स्पोर्टस  फुटबॉल; फादर अ‍ॅग्नेलचीही कूच

Next

मुंबई : बाई अवबाई पेटिट गर्ल्स हायस्कूल आणि फादर अ‍ॅग्नेल मल्टिपर्पज स्कूल अ‍ॅण्ड ज्यूनिअर कॉलेज या संघांनी आपली विजयी घोडदौड कायम राखताना युथ स्पोटर््स फुटबॉल स्पर्धेच्या मुलींच्या गटाची उपउपांत्य फेरी गाठली. दोन्ही संघांनी एकतर्फी झालेल्या लढतीत दणदणीत विजयाची नोंद केली.
घणसोली येथील कॉर्पोरेट पार्क मैदानात झालेल्या सामन्यात बाई अवबाई संघाने तुफानी खेळ करताना सानपाडाच्या रायन इंटरनॅशन स्कूलचा १०-० असा फडशा पाडला. दिनाझ पार्से सरकारी हिने शानदार खेळ करताना चार गोल करत बाई अवबाई संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. पहिल्या सत्रात एक गोल केल्यानंतर तिने दुसºया सत्रात हॅट्ट्रीक नोंदवत रायन संघाला दबावाखाली आणले. त्याचवेळी झेनिया जमशेदजी, अल्ला कोल्हा यांनीही प्रत्येकी २ गोल करत चांगला खेळ केला. रुकसाना ईला, अनुबेन जीवसा यांनी प्रत्येकी एक गोल करत रायन स्कूलचा पराभव निश्चित केला.
फादर अ‍ॅग्नेल संघानेही धमाकेदार विजयाची नोंद करताना चर्चगेटच्या किशनचंद चेलाराम (के.सी.) कॉलेजचा ८-० असा धुव्वा उडवला. अप्रतिम सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना फादर अ‍ॅग्नेल संघाने के. सी. कॉलेजला सहज नमवले. आकांक्षा कांदळकरने ४ गोल करत वर्चस्व राखले. सृथीलक्ष्मी वेदाकेकरमल, अर्मनिथ कामत, सिद्धि मोरे आणि धृती शेट्टी यांनीही प्रत्येकी एक गोल करत चमक दाखवली.
मुलांच्या ज्यूनिअर गटात बलाढ्य डॉन बॉस्कोने (माटुंगा) बालमोहन विद्यामंदिर (इंग्रजी) संघाचा १०-० असा धुव्वा उडवला. मध्यंतरालाच डॉन बॉस्कोने ५-० अशी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला.


 

Web Title:  Bai Avabai Petit Sangh in the semifinals, Youth Sports Football; The journey of Father AğNAL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.