शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

Fifa World Cup, Argentina Messi : मेस्सी ठरला फेल, रोमहर्षक विजयासह अर्जेंटिनाची Round 16 मध्ये एन्ट्री! पोलंडने झुंजवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 07:17 IST

Fifa World Cup, Argentina Messi : अर्जेंटिनाचा स्टार  लिओनेल मेस्सीची एक चूक संघाला बाद फेरीच्या शर्यतीतून 'बाद' करण्यास कारणीभूत ठरली असती.

Fifa World Cup, Argentina Messi : अर्जेंटिनाचा स्टार  लिओनेल मेस्सीची एक चूक संघाला बाद फेरीच्या शर्यतीतून 'बाद' करण्यास कारणीभूत ठरली असती. ग्रुप सी मधून बाद फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी मेस्सीचा अर्जेंटिना आणि लेव्हांडोवस्कीचा पोलंड यांच्यात करो वा मरो लढत होती आणि दोन स्टार समोरासमोर आल्याने बाजी कोण मारतं याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, Argentina vs Poland सामन्यात स्टार ठरला तो पोलंडचा गोलरक्षक वॉजचिएच सिजेसनी ( Wojciech Szczęsny) त्याने मेस्सीसह संपूर्ण अर्जेंटिनाला एकट्याने टक्कर दिली. अर्जेंटिनाचे १० ऑन टार्गेट प्रयत्न त्याने रोखले आणि त्यात मेस्सीने घेतलेल्या पेनल्टीचाही समावेश होता. मेस्सीकडून पेनल्टी चुकली अन् नकोसा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. पण, दुसऱ्या हाफमध्ये अर्जेंटिनाने दोन वेळा पोलंडची बचावभींत ओलांडली अन् विजय निश्चित केला. 

स्पर्धेत अर्जेंटिनाकडून सर्वाधिक २१ सामने खेळण्याचा मॅरेडोनाचा विक्रम आज मेस्सीने तोडला. पोलंड विरुद्धच्या सामन्यात मेस्सीने २८व्या मिनिटाला गोल केलाच होता, परंतु गोलीने चयुराईने तो अडवला. ३३ व्या मिनिटाला डी मारियाने कॉर्नर वरून साधलेला थेट निशाणा गोळजाळीत जाणार तोच पोलंडच्या गोलरक्षकाने आणखी एक सुरेख बचाव केला. अर्जेंटिनाकडून सुरेख खेळ झालेला पाहायला मिळाला. ३७व्या मिनिटाला पोलंडचा गोली पुन्हा आडवा आला. त्याचवेळी त्याच्याकडून मेस्सीला दुखापत झाली. रेफरीने VAR पाहिला आणि अर्जेंटिनाला पेनल्टी दिली. आता मेस्सी गोल करेल हाच आत्मविश्वास सर्वांना होता. पण गोलकक्षक सिजेसनीने अप्रतिम बचाव केला. कदाचित हा क्षण अर्जेंटिनाला स्पर्धेबाहेत करण्यासाठी कारणीभूत ठरू शकली असती. 

६६ टक्के काळ चेंडूवर ताबा, ३२० पासेस आणि ७ ऑन टार्गेट मारूनही अर्जेंटिनाची पहिल्या हाफमध्ये पाटी पोलंडचा गोलरक्षक सिजेसनीने कोरीच राहू दिली. १९६६ नंतर वर्ल्ड कपच्या एकाच पर्वात २ पेनल्टी रोखणारा तिसरा गोलकक्षक आहे. मेस्सी हा #FIFAWorldCup स्पर्धेत दोन ( २०१८ वि. आईसलँड) पेनल्टी मिस करणारा दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी १९६६ साली घानाच्या आसामोह जियानने दोन पेनल्टी मिस केल्या होत्या. दुसऱ्या हाफमध्ये अर्जेंटिनाने धडाकेबाज सुरुवात केली आणि दुसऱ्याच मिनिटाला (४६ मि.) मॅक एलिस्टरने मोनिलाच्या पासवर अप्रतिम गोल केला. #Argentina ने १-० अशी आघाडी घेतली. 

६१ व्या मिनिटाला एलिस्टरने आघाडी डबल केली असती, परंतु यावेळी चेंडू पोलंडच्या गोलीच्या हाती सहज विसावला. दरम्यान सौदी अरेबिया आणि मेक्सिको यांच्या लढतीत मेक्सिकोने २-० अशी आघाडी घेत पोलंडला मदत केलीय  मेस्सीला गोल करण्यात अपयश येत असताना अर्जेंटिनाचे अन्य खेळाडू सुसाट सुटले... ६७ व्या मिनिटाला अलव्हारेजने पोलंडला ०-२ असे बॅकफूटवर फेकले आणि विजयाची नोंद करून बाद फेरीत प्रवेश केला. 

  • वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यात ५ + संधी निर्माण करणे आणि ५+  ड्रिबल करणारा मेस्सी हा १९६६ पासूनचा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. तो ३५ वर्ष व १५९ दिवसांचा आहे. याआधी डिएगो मॅरेडोनांनी १९९४ मध्ये नायजेरियाविरुद्ध असा विक्रम केला होता.
  • अर्जेंटिनाने सलग पाचव्यांदा ( २००६, २०१०, २०१४, २०१८ व २०२२) वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. १४ स्पर्धांमध्ये त्यांनी १३ वेळा हा टप्पा गाठला आहे. 

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Lionel Messiलिओनेल मेस्सीArgentinaअर्जेंटिना