शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

रोनाल्डो झाला रक्तबंबाळ, हेडर मारताना खेळाडूचा पाय डोळ्याखाली लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 02:05 IST

ला लीगा स्पर्धेच्या डिपोर्टिवो संघाविरुद्ध हेडरद्वारे गोल करण्याच्या प्रयत्नात रेयाल माद्रिदचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो जखमी झाल्याने रक्तबंबाळ झाला आणि उपस्थित चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. हा सामना बलाढ्य रियाल माद्रिदने ७-१ गोलने एकतर्फी जिंकला, मात्र चर्चा झाली ती रोनाल्डोला झालेल्या जखमेची. दरम्यान, मैदानाबाहेर उपचार करून पुन्हा परतलेल्या रोनाल्डोने आणखी एक गोल करत आपल्या झुंजार खेळाचे प्रदर्शनही केले.

माद्रिद : ला लीगा स्पर्धेच्या डिपोर्टिवो संघाविरुद्ध हेडरद्वारे गोल करण्याच्या प्रयत्नात रेयाल माद्रिदचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो जखमी झाल्याने रक्तबंबाळ झाला आणि उपस्थित चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. हा सामना बलाढ्य रियाल माद्रिदने ७-१ गोलने एकतर्फी जिंकला, मात्र चर्चा झाली ती रोनाल्डोला झालेल्या जखमेची. दरम्यान, मैदानाबाहेर उपचार करून पुन्हा परतलेल्या रोनाल्डोने आणखी एक गोल करत आपल्या झुंजार खेळाचे प्रदर्शनही केले.रविवारी रात्री झालेल्या या सामन्यात जखमी झाल्यानंतर रोनाल्डोने मैदान सोडले. यानंतर त्याने चेहºयावरील जखमेवर आवश्यक उपचार करून दमदार पुनरागमन केले आणि आणखी एक गोल करत माद्रिदच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याआधी लोपेझ अल्वारेज याने २३व्या मिनिटालाच डिपोर्टिवो संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र यानंतर माद्रिदने सलग ७ गोलचा धडाका करत दणदणीत विजय मिळवला.या वेळी एक हेडर करण्याच्या प्रयत्नात रोनाल्डो गंभीररीत्या जखमी झाला. उजव्या बाजूने आलेला पास हवेत हेडर करण्याच्या प्रयत्नात रोनाल्डोने झेप घेतली आणि गोलही केला. मात्र या वेळी प्रतिस्पर्धी संघाचा बचावपटू फॅबियिन स्कारचा पाय रोनाल्डोच्या डाव्या डोळ्याखाली जोरात लागला आणि रोनाल्डोचा चेहरा तत्काळ रक्तबंबाळ झाला. यानंतर माद्रिद संघाच्या फिजियोंनी मैदानात धाव घेत रोनाल्डोला मैदानाबाहेर आणले. डॉक्टरांनी रोनाल्डोला सावधपणे खेळण्याचा सल्ला दिला. परंतु, रक्तातच फुटबॉल भिनलेल्या रोनाल्डोने आपला आक्रमक खेळ कायम ठेवताना आणखी एक गोल करत आपला धमाकेदार खेळ सादर केला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डो