शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

युएफा चॅम्पियन्स लीग : रोनाल्डो-मेस्सी जेतेपदासाठी भिडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 17:49 IST

UEFA Champions League: युरोपातील सर्वात प्रतिष्ठित चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले

माद्रिद : युरोपातील सर्वात प्रतिष्ठित चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या जगातील अव्वल खेळाडूंनी आपापल्या संघाला अंतिम आठ संघात प्रवेश मिळवून देताना जेतेपदाच्या दिशेनं वाटचाल कायम राखली आहे. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत रोनाल्डो आणि मेस्सी समोर येतात का, याची उत्सुकता लागली होती. मात्र, जाहीर झालेल्या ड्रॉनंतर उपांत्यपूर्व फेरीत हे खेळाडू समोरासमोर येण्याची शक्यता मावळली आहे, परंतु अंतिम फेरीत बार्सिलोना आणि युव्हेंटस हे क्लब जेतेपदासाठी भिडण्याची शक्यता नाकारता येत नाही.युव्हेंटसने 0-2 अशा पिछाडीवरून अॅटलेटिको माद्रिदवर 3-2 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. परतीच्या सामन्यात रोनाल्डोनं हॅटट्रिक साजरी करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. रोनाल्डोनं रेयाल माद्रिदची साथ सोडल्यामुळे स्पॅनिश क्लबला उपउपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. रेयाल माद्रिदला नमवणाऱ्या अयाक्स क्लबशीच उपांत्यपूर्व फेरीत युव्हेंटसला भिडावे लागणार आहे. अयाक्स क्लब आणि युव्हेंटस यांच्यास उपांत्यपूर्व फेरीचा सामना, 2003 नंतर अयाक्स क्लबने प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे आणि घरच्या मैदानावर त्यांनी एकही सामना गमावलेला नाही. 1996च्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत उभय क्लब भिडले होते आणि निर्धारित वेळेतील 1-1 अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये युव्हेंटसने बाजी मारली होती. उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य सामन्यात इंग्लिश प्रीमिअर लीगमधील लिव्हरपूल क्लब उपांत्यपूर्व फेरीत पोर्तोचा सामना करणार आहे. लिओनेल मेस्सीच्या बार्सिलोनासमोर इपीएल माजी विजेत्या मँचेस्ट युनायटेडचे आव्हान आहे. 2007-08 च्या उपांत्य फेरीनंतर बार्सिलोना आणि युनायटेड प्रथमच लीग सामन्यात समोरासमोर येणार आहेत. 2009 आणि 2011 च्या अंतिम फेरीत हे संघ समोरासमोर आले होते आणि दोन्ही वेळेला मेस्सीच्या खेळाच्या जोरावर बार्सिलोनाने बाजी मारली. चौथ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात टोदनहॅम आणि मँचेस्टर सिटी समोरासमोर आहेत.बार्सिलोना आणि युव्हेंटस यांच्यात उपांत्यपूर्व फेरीत सामना होणार नसला तरी ड्रॉनुसार हे क्लब अंतिम फेरीत भिडू शकतील. त्यामुळे रोनाल्डो व मेस्सीच्या चाहत्यांना धमाकेदार सामना पाहण्याची संधी मिळू शकते. उपांत्य फेरीत टोदनहॅम/ मँचेस्टर सिटी आणि अयाक्स/ युव्हेंटस यांच्यातील विजेता संघ भिडतील, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत बार्सिलोना/मँचेस्टर युनायटेड आणि लिव्हरपूल/पोर्तो यांच्यातला विजयी संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. त्यामुळे अंतिम फेरीत बार्सिलोना व युव्हेंटस यांच्यात चुरस पाहायला मिळेल.  

टॅग्स :UEFA Champions Leagueचॅम्पियन्स लीग फुटबॉलCristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोLionel Messiलिओनेल मेस्सी