शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मिसळच्या तिखट-जाळ स्वादानं जगाला साद !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 10:49 IST

Food: नाश्त्याला तुम्हाला सर्वाधिक काय आवडतं? किंवा नाश्त्याला तुम्ही काय पसंत करता? - पोहे, उपमा, शिरा, मिसळ, पराठे, छोले भटुरे, इडली, डोसा?.. हे झालं आपल्याकडचं? पण जगाचा विचार केला तर लोकांना नाश्त्याला सर्वाधिक कोणता पदार्थ आवडत असेल?

नाश्त्याला तुम्हाला सर्वाधिक काय आवडतं? किंवा नाश्त्याला तुम्ही काय पसंत करता? - पोहे, उपमा, शिरा, मिसळ, पराठे, छोले भटुरे, इडली, डोसा?.. हे झालं आपल्याकडचं? पण जगाचा विचार केला तर लोकांना नाश्त्याला सर्वाधिक कोणता पदार्थ आवडत असेल? ‘टेस्ट ॲटलास’ या ग्लोबल फूड ॲण्ड ट्रॅव्हल गाइडनं जगात लोकांना सर्वाधिक पसंत असणाऱ्या नाश्त्याच्या ५० पदार्थांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. त्यात तुर्कीच्या ‘कहवाल्टी’ या पदार्थानं पहिला आणि सर्बियाच्या ‘कॉम्प्लेट लेपिन्जा’ या पदार्थानं दुसरा क्रमांक पटकावला असला तरी भारतीय पदार्थही त्यात मागे नाहीत.

नाशिकची मिसळ सर्वांत भारी की कोल्हापूरची की पुण्याची की नगरची की तुमच्या गल्लीतल्या कोपऱ्यावरच्या अमक्या-तमक्याची?.. यावरून आपण भलेही प्रेमानं भांडत असू, पण शेवटी मिसळ ती मिसळ.. आपल्या सर्वांनाच कुठली ना कुठली मिसळ प्यारी असली तरी जगात मात्र एकूणच अनेकांना नाश्त्यासाठी मिसळ फारच प्यारी आहे. मिसळनं जगात नाव कमावलं आहे. नाश्त्यासाठी जगातील सर्वोत्तम ५० पदार्थांच्या यादीत मिसळनं १८ वा क्रमांक मिळविला आहे.

पराठे आणि छोले भटुरे हेदेखील भारतामध्ये नाश्त्यासाठी अत्यंत प्रिय असलेले पदार्थ आहेत. अर्थातच त्यांनीही या यादीत आपलं स्थान पटकावलं आहे. या यादीत (मूळ) पंजाबी पराठे आहेत २३व्या क्रमांकावर तर दिल्लीच्या छोले भटुऱ्यांनीही ३२वा क्रमांक पटकावला आहे. यामध्ये नुसत्या लोकप्रियतेचाच नाही, तर कोणते पदार्थ त्यातल्या त्यात अधिक पौष्टिक आहेत, याचाही विचार करण्यात आला आहे. प्रोटीन आणि पॉवरफूल टेस्ट.. खवय्यांच्या तोंडाला पाणी सोडणारा हा झणझणीत मामला सरस ठरला नसता तरच नवल!अर्थात या यादीत इडली आणि डोसे यांचा नंबर कसा लागला नाही यावरून अनेकांनी आश्चर्य आणि खेद व्यक्त केला असला तरी झणझणीत मिसळच्या तिखट-जाळ स्वादाला मात्र त्यांनीही पसंतीच दर्शविली आहे.

टॅग्स :foodअन्नInternationalआंतरराष्ट्रीय