शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

चटपटीत, पण तितकेच गलिच्छ; नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना चाप बसवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 09:38 IST

अशा वेळी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालविल्याबद्दल संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल केल्याशिवाय ही यंत्रणा सुधारणार नाही.

मिलिंद बेल्हे, सहयाेगी संपादक

अंडरवेअरवर बसून जमिनीवर पाणीपुरीच्या पुऱ्या लाटण्याचा मीरा-भाईंदरमधील व्हिडीओ व्हायरल झाला आणि गलिच्छ वातावरणातील अन्नपदार्थांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. अन्न आणि औषध भेसळ प्रतिबंधक विभागाचे (एफडीए) वाभाडे काढले गेले. यापूर्वीचा पायाने पाणीपुरीचे पीठ मळण्याचा व्हिडीओ असेल, पिंपात पाणी भरून त्यात चड्डीवर उभे राहून गाजरे धुण्याचा विषय असेल, सांडपाणी वापरून रेल्वेस्थानकात धुतली जाणारी फळे असोत की गटारात पडलेली फळे गोळा करून तशीच विकण्याचा प्रकार असो, दरवेळी त्यावर फक्त चर्चा झाली. पण कधी कोणावर कारवाई झाली नाही. हे अन्नपदार्थ बनवणारे शौचास जातात, लघवीला जातात, त्यातील अनेकांना त्वचारोग असतात; पण त्यांच्या आरोग्याची-स्वच्छतेची कधी चर्चा होत नाही. 

अनेकदा दुकानांत, रस्त्यावर, रेल्वेगाड्यांत घरगुती पदार्थ मिळतात, पण त्यावर ना बनवल्याची तारीख असते, ना ते पदार्थ कधी खराब होतील (एक्स्पायरी डेट) त्याचा उल्लेख. मिठाई २४ तासांत संपवावी, असे छापण्याच्या बंधनाचे असेच तीनतेरा वाजविण्यात आले. मिठाईत वापरले जाणारे दुय्यम दर्जाचे घटक, आरोग्यास अपायकारक रंग हेही कधी कोणी तपासत नाही. लस्सी, सरबते, खरवस यांचीही तशीच कथा.

खाद्यपदार्थ बनविणाऱ्या ठिकाणी कोणते तेल वापरले जाते, किती वेळा त्याचा पुनर्वापर होतो, पदार्थात वापरल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचा दर्जा, जागेची स्वच्छता, कामगारांचे आरोग्य, तेथे वापरले जाणारे पाणी, भांडी घासून धुण्यापेक्षा विसळून वेळ मारून नेण्याचा उद्योग यावरून आरडाओरडा झाला की आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्याचे सांगून एफडीएचे अधिकारी हात वर करतात. निचे दुकान, उप्पर मकान अशा अवस्थेत स्थानकातच संसार थाटणाऱ्या स्टॉलबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही पाहणीचे फक्त आदेश काढले. पण नंतर सारे आपोआप शांत झाले.  मग याची जबाबदारी कोणाची? अशा वेळी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालविल्याबद्दल संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल केल्याशिवाय ही यंत्रणा सुधारणार नाही. अन्यथा असे गलिच्छ व्हिडीओ येत राहतील.