शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळा आला, आता सरबत हाणा! प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितल्या सरबतांच्या खास रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 11:20 IST

Vishnu Manohar: उन्हाच्या काहिलीने अंग भाजू लागलंय. दिवसागणिक पारा नवे उच्चांक गाठतोय. थंडाव्यासाठी सरबत घ्यायचं म्हटलं, तरी लिंबू सरबत किंवा कैरीचे पन्हे असे नित्याचे पर्याय आठवतात. रणरणत्या आणि डोके भणभणवणाऱ्या उन्हात थंडावा देणारी ही काहीशी वेगळी सरबतं, त्यांच्या कृतीसह खास तुमच्यासाठी...

- विष्णू मनोहर (प्रसिद्ध शेफ)

उन्हाच्या काहिलीने अंग भाजू लागलंय. दिवसागणिक पारा नवे उच्चांक गाठतोय. थंडाव्यासाठी सरबत घ्यायचं म्हटलं, तरी लिंबू सरबत किंवा कैरीचे पन्हे असे नित्याचे पर्याय आठवतात. रणरणत्या आणि डोके भणभणवणाऱ्या उन्हात थंडावा देणारी ही काहीशी वेगळी सरबतं, त्यांच्या कृतीसह खास तुमच्यासाठी...

तिखट सरबत साहित्य : पुदिना अर्धी वाटी, हिरवी मिरची एक, किसलेली कैरी अर्धी वाटी, जिरे एक चमचा, साखर अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, पाणी अर्धा लिटरकृती : सर्व जिन्नस एकत्र करुन मिक्सरमध्ये बारीक करा, चाळणीतून गाळून घ्या. थंड करून प्यायला द्या.

पुदिना सरबतसाहित्य : पुदिना एक वाटी, दोन लिंबांचा रस, एक चमचा तुळशीचे बी, साखर एक चमचा, मीठ अर्धा चमचा, पाणी अर्धा लिटरकृती : पुदिना बारीक चिरुन किंवा कुटून अर्धा लिटर पाण्यात घाला, त्याचबरोबर इतर सर्व जिन्नस त्या पाण्यात घालून एकत्र करा. साखर व मीठ विरघळल्यावर थंड करून प्यायला द्या.

कोकम सरबतसाहित्य : कोकम (आमसूल) एक वाटी, साखर अर्धी वाटी, जीरे पावडर अर्धा चमचा, मीठ पाव चमचा.कृती : सर्वप्रथम अर्धा लिटर पाण्यात कोकम घालून एकत्र करुन चांगले पिळून घ्या. नंतर यात साखर, मीठ व जीरे पावडर घालून घोळवून घ्या. थंडगार प्यायला द्या.

बेलफळ सरबत  वाळलेल्या बेलाच्या गराची पावडर तयार करून गरम दुधात पिठीसाखरेसोबत रोज एक चमचा घेतल्यास शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते.साहित्य : एका बेलफळाचा गर, पाव चमचा मीठ, दोन चमचे साखरकृती : सर्व जिन्नस एकत्र करुन व मिक्सरमध्ये फिरवून गाळून घ्या. नंतर यात अर्धा लिटर थंड पाणी घालून प्यायला द्या.

लिंबू-सब्जा सरबतसाहित्य : तीन लिंबांचा रस, दोन चमचे सब्जा बी, मीठ चिमूटभर, साखर एक वाटी, खायचा चुना चिमूटभरकृती : साखर, मीठ, लिंबाचा रस एकत्र करा. नंतर यात अर्धा लिटर पाणी व दोन चमचे सब्जाचे बी घाला. १० ते १५ मिनिटे थंड करुन प्यायला द्या.

टॅग्स :foodअन्नVishnu Manoharविष्णु मनोहर