शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Makar Sankranti Special : या पारंपारिक पदार्थांशिवाय साजरीच होऊ शकणार नाही मकरसंक्रांत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 16:34 IST

Makar Sankranti 2020 : नवीन वर्षाचा पहिला सण पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत.

नवीन वर्षाचा पहिला सण पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. या दिवशी मनातील सर्व राग रूसवे दूर करून तिळगुळाने सर्वांचं तोंड गोड करतात. मोठ्या उत्साहात भारतात मकरसंक्रांत हा सण साजरा केला जातो. मकरसंक्रांत या सणाला घरामध्ये खास पारंपरिक पदार्थ केले जातात. अशाच काही पदार्थांविषयी जाणून घेऊया. हे पदार्थ तुम्ही या मकरसंक्रातीला तयार करून  घरातल्या मंडळींना खूश करू शकता.

तिळाचे लाडू - मकरसंक्रांतीसाठी घरोघरी तिळाचे लाडू तयार केले जातात. तीळ शरीराला उष्णता देण्यासाठी फायदेशीर ठरतात. तिळामध्ये असलेले कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, झिंक आणि सेलेनियम यासारखे पौष्टीक घटक हृदयासाठी फायदेशीर ठरतात. गूळ आणि तीळ एकत्र करून लाडू तयार केले जातात.

शेंगदाण्याची चिक्की - मकरसंक्रांतीला शेंगदाणे, गूळ आणि तूप यांपासून शेंगदाण्याची चिक्की तयार केली जाते. शेंगदाण्याच्या चिक्कीमध्ये प्रोटीन्स आणि इतर पोषक घटक भरपूर प्रमाणात असल्याने ती शरीरासाठी उपयुक्त असतं.

तिळाची चिक्की - हिवाळ्यामध्ये आहारात तिळाचा समावेश करण्याचा सल्ला देण्यात येतो. थंडीमध्ये शरीराला उष्णता देण्यासाठी गूळ आणि तीळ एकत्र करून तिळाची चिक्की तयार केली जाते. तिळामध्ये सेसमीन नावाचं एक अ‍ॅन्टीऑक्सिडंट आढळून येतं. जे कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्याचं काम करतात.

चुरमुऱ्याचे लाडू - चुरमुऱ्याचे लाडू हे लहान मुलांना प्रचंड आवडतात. गुळाचा पाक आणि चुरमुरे वापरून गोड लाडू हे अनेकांच्या घरी खास मकरसंक्रांतीसाठी तयार केले जातात. चुरमुऱ्याचे लाडू हे शरीरासाठी उत्तम असतात.

पातिशप्ता - मकरसंक्रांतीसाठी प्रत्येक बंगाली कुटुंबात पातिशप्ता हा पारंपरिक पदार्थ तयार केला जातो. मैदा, गहू किंवा तांदळाचं पीठ, गुळ, नारळ, दूध यासह अन्य काही पदार्थ वापरून पातिशप्ता हा गोड पदार्थ तयार केला जातो.

पुरणपोळी - पुरणपोळी हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. सणासुदीला, नैवेद्याच्या स्वयंपाकात हमखास पुरणपोळी केली जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पुरणपोळी तयार केली जाते.

गुळपोळी - गूळ, तीळ, भाजणीचे चण्याचे पीठ, वेलची पावडर, दाण्याचा कुट, खसखस, खोबरे वापरून गुळपोळी तयार केली जाते. गुळपोळी हा पौष्टीक पदार्थ चिमुकल्यांना अतिशय आवडतो.

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीfoodअन्न