शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
3
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
4
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
5
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
6
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
7
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
8
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
9
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
10
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
11
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
12
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
13
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
14
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
15
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
16
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
17
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
18
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
19
BIGG BOSS 19 House: असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
20
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल

पिझ्झाच्या लोकप्रियतेचे ‘सिक्रेट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 05:07 IST

दरवर्षी जगभरात घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सर्व्हेमध्ये सर्वोत्तम जागतिक खाद्यपदार्थ किंवा सर्वात लोकप्रिय पदार्थ म्हणून इटालियन पदार्थांना सर्वोच्च स्थान दिले जात आहे.

- भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकार, bhalwankarb@gmail.com

घरोघरी मुलाबाळांना विचारलंत की तुम्हाला सगळ्यात जास्त खायला काय आवडतं, तर बहुतेक वेळा उत्तर मिळेल पिझ्झा किंवा पास्ता. हे आपल्या भारतातीलच चित्र नाही, तर जगभरात हेच चित्र आहे. दरवर्षी जगभरात घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सर्व्हेमध्ये सर्वोत्तम जागतिक खाद्यपदार्थ किंवा सर्वात लोकप्रिय पदार्थ म्हणून इटालियन पदार्थांना सर्वोच्च स्थान दिले जात आहे. भूमध्य समुद्राच्या आजूबाजूच्या देशांपैकी हा एक देश. अतिप्राचीन संस्कृती, धार्मिक, कलासाहित्यविषयक चळवळीच्या केंद्रस्थानी वेळोवेळी राहिलेल्या इटलीच्या अस्तित्वाचा गाभा आहे कुटुंब. इटालियन संस्कृतीत कुटुंबाला अतिशय महत्त्व आहे, त्यातही कुटुंबप्रमुख आई फार महत्त्वाची असते. तिने रांधलेल्या स्वयंपाकाचा कुटुंबाने एकत्र येऊन आस्वाद घेण्याची प्रथा इथे पिढ्यान‌्पिढ्या आहे.  विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हीच संस्कृती काखोटीला मारून अनेक इटालियन कुटुंबांनी अमेरिकेत स्थलांतर केलं. त्यांच्या आगमनाबरोबर अमेरिकेत अनेक ठिकाणी छोटी-छोटी उपाहारगृहे निघाली. या उपाहारगृहांनी आधी अमेरिकेला आणि नंतर अख्ख्या जगाला वेड लावलं. आंबवलेल्या मैद्याच्या पोळीवर टोमॅटोची चटणी (मारीनारा सॉस), चीझ आणि इतर पदार्थ घालून ही पोळी भट्टीत भाजायची, इतका साधा पदार्थ पण त्याचा दिमाख केवढा. २०१४ सालच्या जगप्रसिद्ध ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एलेन डिजेनेरेस या सोहळा सादरकर्तीने अचानक ‘बिग ममाज अँड पापाज पिज्झेरिया’ नावाच्या रेस्टॉरंटमधून पिझ्झा मागवला. तिथे उपस्थित असलेल्या ब्रॅड पिट, मेरिल स्ट्रीप आणि हॅरिसन फोर्डसारख्या हॉलिवूडच्या दिग्गजांनी हा पिझ्झा खाल्ला. पिझ्झा घेऊन आलेल्या बिग ममाज अँड पापाजच्या मालकाला आपण एवढ्या बाप लोकांना पिझ्झा खाऊ घालणार आहोत, हे माहीत नव्हते. एबीसी नेटवर्कने या सोहळ्याचे प्रक्षेपण केले होते. एका अंदाजानुसार या कार्यक्रमात तीन मिनिटांची जाहिरात करणाऱ्याला साधारण एक्याऐंशी कोटी रुपये खर्च करावे लागले असते, पण एलेनची विनोदबुद्धी आणि पिझ्झाच्या लोकप्रियतेमुळे या अनोळखी पिझ्झा चेनला फुकटात जाहिरात मिळाली आणि रातोरात त्यांच्या पिझ्झाचे नाव जगभरात प्रसिद्ध झाले.