शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Sankashti Chaturthi 2023: साबुदाणा खिचडी, वडे, आप्पे यावर उतारा म्हणून संकष्टीला ट्राय करा उपासाची चमचमीत भजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 12:50 IST

Sankashti Chaturthi food recipe 2023: संकष्टीच्या आदल्या रात्री साबुदाणा भिजवायला विसरलात, तरी अवघ्या पंधरा मिनिटांत बनवता येईल अशी रेसेपी!

गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात. त्यानुसार नुसत्या उपसासाठी गृहिणींनी पाकसिद्धी करून उपासाच्या पदार्थांचे शेकडो प्रकार शोधून काढले. तरीसुद्धा उपासाला निवडून येते साबुदाण्याची खिचडी नाहीतर वरी भात आणि दाण्याची आमटी! मात्र तेच तेच प्रकार करून कंटाळला असाल आणि जिभेचे चोचले पुरवण्याच्या शोधात असाल तर उपासाच्या भज्यांची रेसेपी खास तुमच्यासाठी! ११ मार्च रोजी संकष्टी आहे, त्यानिमित्त हा प्रयोग करून बघा!जेणेकरून चविष्ट रेसिपीने मन तृप्त होईल आणि उपास व उपासनाही आनंदात पार पडेल. चला तर शिकून घेऊया उपासाच्या भजीची सोपी, झटपट आणि चविष्ट रेसेपी!

साबुदाणा भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य : 

बटाटे, हिरव्या मिरच्या, सैंधव मीठ किंवा साधं मीठ, काळी मिरी पूड, पाणी, तेल 

साबुदाण्याची भजी बनवण्याची कृती : 

- सर्वप्रथन साबुदाणा स्वच्छ कापडाने पुसून घ्या. जेणेकरून त्यावरील सर्व पावडर निघून जाईल.

- त्यानंतर एका कढईमधे एक वाटी साबुदाणा घालून तो मंद आचेवर ४-५मिनिटे भाजून घ्या.

- साबुदाणा कढईतून काढून घ्या आणि थंड होऊ द्या. थंड झालेला साबुदाणा मिक्सरमध्ये जाडसर राहील अशा बेताने फिरवा.

- यानंतर साबुदाण्याची पावडर बाजूला ठेवा.

- मिक्सरच्या भांड्यात २ कच्चे बटाटे कापून त्याच्या फोडी टाका. त्यात एक वाटी पाणी २ ते ३ हिरव्या मिरच्या घालून फिरवा.

- या मिश्रणात साबुदाण्याची पावडर घालून पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करा.

- आता हे एकजीव झालेले मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. आणि १० मिनिटे एकजीव होण्यासाठी ठेवून द्या. 

- १० मिनिटानंतर हे मिश्रण थोडे घट्ट होईल. मग त्यात अजून थोडेसे पाणी घालून मऊसूत भज्यांसाठीचे मिश्रण तयार करा.

- नंतर त्यात तुमच्या घरी जे जिन्नस उपवासाला खाल्ले जात असतील त्यानुसार घाला. जसे की, कोथिंबीर, काळी मिरीपूड, सैंधव मीठ, कोथिंबीर घाला आणि एकत्र करा.

- तुम्ही यामध्ये शेंगदाणे भरड देखील घालू शकता.

- त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून भजी टाकून तळून घ्या. 

- मध्यम आचेवर भाजी खमंग तळून घ्या आणि खोबऱ्याच्या किंवा खजुराच्या चटणी बरोबर गरमागरम सर्व्ह करा. 

- याच मिश्रणापासून तुम्ही आप्पेदेखील तयार करू शकता.

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीfoodअन्न