शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 12:07 IST

Perfect Tea Recipe: चहाची रेसेपी सोपी असली, तरी सगळ्यांनाच तो चांगला करता येतो असं नाही; मात्र तुम्हाला उत्तम चहा बनवायचा असेल तर दिलेली ट्रिक नक्की वापरून बघा!

भारतीयांचा रक्तगट विचाराल तर तो 'टी' पॉझिटिव्हच निघेल! कारण निमित्त कोणतेही असो, सोबतीला चहा लागतोच! त्यात आता हिवाळा आणि वाढती थंडी पाहता आल्याचा फक्कड चहा तर हवाच हवा! थंडीत आल्याचा चहा प्यायल्याने रोग प्रतिकार शक्ति देखील वाढते. आता नुसतं वाचूनही चहाची तलफ आली असेल तर जरा थांबा, लेख पूर्ण वाचा, त्यात दिलेल्या आल्याची ट्रिक वापरा आणि घरच्या घरी बासुंदी चहाचा आस्वाद घ्या!

'चहाला वेळ नसते, पण वेळेवर चहा हवा!' त्यातही तो आलं किसून टाकलेला असेल तर विचारूच नका! मात्र अनेकांना चहात आलं टाकल्यावर चहा फाटल्याचा, नासल्याचा किंवा कडवट झाल्याचा अनुभव येतो. मग टपरी वरच्या खलबत्त्यात कुटून टाकलेल्या आल्याचा आवाज कानात घुमतो. आलं नक्की कसं टाकावं असा प्रश्न पडतो, यावर उत्तर म्हणून ही खास ट्रिक फॉलो करा!

चहा बनवण्यासाठी खलबत्त्यात कुटून, ठेचून घेतलेलं आलं घालणं कधीही चांगलं! कारण आले कुटून घातल्यामुळे चहामध्ये आल्याची चव छान उतरते.  आले किसून टाकल्यामुळे चहा कडू होऊ शकतो. आल्याची चव आणि सुगंध अधिक तीव्र होते, ज्यामुळे चहाची चव बिघडते. आल्याचे तंतू तुटतात आणि ते चहामध्ये पूर्णपणे एकजीव होऊ शकत नाहीत. 

आलं घातल्यावर चहा फाटतो/ नासतो?

तुमचाही चहा आलं घातल्यावर नासत असेल, दूध फाटत असेल, तर चहामध्ये आलं घालण्याची योग्य वेळ समजून घ्या. चहाचे आधण ठेवल्यावर त्यात पाणी उकळल्यावर चहा पावडर आणि साखर घाला. चहा पावडर छान एकजीव झाली की लालसर रंग येईल, तेव्हा कुटून घेतलेलं आलं टाका आणि त्यावर झाकण ठेवून एक वाफ काढा. दुसऱ्या पातेल्यात दूध गरम करून घ्या आणि १० सेकंद चहा उकळून झाला की कपात गाळून ओतल्यावर त्यात हवे तेवढे दूध घाला, चहा फक्कड लागणार याची गॅरेंटी!

चहाने ऍसिडिटी कशी टाळावी?

अति तिथे माती, हे आपण जाणतोच. चहाने तजेला येतो हे मान्य, पण दिवसभरात पाच-सात कपाच्या वर चहा पीत असाल तर साखर वाढेल आणि ऍसिडिटीही सुरु होईल. कोणतीही गोष्ट प्रमाणात घेतल्यास त्याचा त्रास होत नाही. चहा फार तर दोन ते तीन वेळा प्यावा. सकाळी, दुपारी, संध्याकाळी! रात्री चहा प्यायल्याने झोपेवर परिणाम होतो. तसेच तीनपेक्षा जास्त वेळा चहा प्यायल्यानेही त्रास होतो. भूकेवर, पचन शक्तीवर आणि दाताच्या आरोग्यावर परिणाम होतो. चहा सेवनानंतर गॅस आणि ऍसिडिटी टाळायची असेल तर चहा पिण्याआधी भरपूर पाणी प्या, त्यामुळे चहाचे दुष्परिणाम शरीरावर होणार नाहीत आणि आवश्यक लाभ शरीराला मिळतील. 

चला तर, एवढं चहा पुराण वाचून झालं असेल तर आता एक कप चहा टाका आणि या बोचऱ्या थंडीत मस्त एन्जॉय करा!

टॅग्स :foodअन्नWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी