शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘पुरोडाश’पासून जन्माला आलेली पराठेशाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 05:35 IST

सकाळची न्याहारी दणदणीत करायची असेल तर पराठ्याला पर्याय नाही. महाराष्ट्रात थोडं कमीच, पण जसजसं उत्तरेकडे जावं तसतसं याचं प्रस्थ वाढत जातं.

सकाळची न्याहारी दणदणीत करायची असेल तर पराठ्याला पर्याय नाही. महाराष्ट्रात थोडं कमीच, पण जसजसं उत्तरेकडे जावं तसतसं याचं प्रस्थ वाढत जातं. शेकडो तऱ्हांचे गरमागरम, लज्जतदार पराठे खाण्यासाठी जुन्या दिल्लीच्या ‘पराठा गल्ली’चा दौरा करणारे खवय्ये आहेत. पराठा अथवा परोठा हा खरंतर साधासुधा गव्हाच्या पिठाचा लाटून भाजलेला गोलाकार. पण, त्याचे प्रकार किती? एक नुसताच वेगवेगळ्या घड्या घालून किंवा वळकट्या करून, तूप/तेल लावून करतात, यात सारणबिरण नसतं. दुसरा- कणिक मळतानाच तिच्यात बारीक चिरलेल्या भाज्या, मसाले घातलेला. तिसरा- जरा शानदार.. पारीत सारण भरून केलेला भरवाँ पराठा. शिवाय या सर्वांचे उपप्रकार... याच्याइतका सर्वसमावेशक कोणी नाही. कोणी म्हणतात हा पर्शियन प्रकार आहे, मुघलांनी आणला इ. इ... खरं का? गहू हे अतिप्राचीन तृणधान्य. फळं-कंदमुळांवर गुजराण करणाऱ्या मानवाने त्याचं बीज पेरायला सुरुवात केली त्यालाच दहाएक हजार वर्षं लोटली असतील. गव्हाची लागवड हा मानवाच्या आहारपद्धतीत आमूलाग्र बदल घडवणारा टप्पा. (आताचे) लेबनॉन, पॅलेस्टाईन, सीरिया व आसपास हा मध्यपूर्वेतला भूभाग फार प्राचीन काळापासून सुपीक. गव्हासाठी अत्युत्तम. इथे रुजलेला गहू हळूहळू इराक, इराण, अफगाणिस्तानमार्गे सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात प्रविष्ट झाला. पुढल्या सहस्रकांत भारतीयांनी गव्हाची कित्येक वाणं तयार केली. पूरिका, पोलिका या संस्कृतमधल्या पुऱ्या आणि पोळ्या आपल्या माहितीच्या. पण, विस्मरणात गेलेला एक प्रकार म्हणजे ‘पुरोडाश’. जाडजूड गोलमटोल रोटीसारखा, भरपूर तूप चोपडलेला पुरोडाश. मात्र, तो तांदळाच्या पिठाचा असे. कालांतराने पुरोडाश या शब्दावरून ‘परोठा’ हा शब्द आला असावा. म्हणजे गव्हाचा प्रसार चांगल्यापैकी झाल्यानंतर कदाचित गव्हाच्या पिठाचेही पुरोडाश केले जात असतील. तिकडे गव्हाने मध्यपूर्वेतून युरोपात धडक मारली होती आणि ब्रेडचे अगणित प्रकार जन्मले होते. पण, ते प्रामुख्याने आंबवलेले. पराठ्याची खुबी अशी की पीठ आंबवायला लागत नाही. भारतात येणाऱ्या परकीयांना ताज्या कणकेची खुमारी आणि आरोग्यगुण जाणवले आणि बाराव्या शतकापासून परोठ्याची भरभराट झाली.- मेघना सामंत, (लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)askwhy.meghana@gmail.com