शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आपलं ‘लोणचं’ आणि त्यांचं ‘पिकल’..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 11:41 IST

Food News: मागच्या लेखात आपण खारवणे अर्थात सन ड्राइंग याबद्दल वाचलं. याचाच एक उपप्रकार म्हणजे मुरवणे. या मुरवण्यातही अनेक प्रकार आहेत. साधारणपणे यात भाज्यांना मीठ लावून बरणी अथवा माठात ठेवून, झाकण घट्ट लावून त्या उन्हात ठेवल्या जातात. 

मागच्या लेखात आपण खारवणे अर्थात सन ड्राइंग याबद्दल वाचलं. याचाच एक उपप्रकार म्हणजे मुरवणे. या मुरवण्यातही अनेक प्रकार आहेत. साधारणपणे यात भाज्यांना मीठ लावून बरणी अथवा माठात ठेवून, झाकण घट्ट लावून त्या उन्हात ठेवल्या जातात. 

भाज्या अथवा आवळा, लिंबू यासारख्या फळांना मिठामुळे पाणी सुटते अन् उन्हामुळे अन् हवेच्या अभावामुळे या द्रावणात जीवाणूंची वाढ होण्यास अटकाव होतो. काही दिवसांत या भाज्यांचा किंवा फळांचा पोत काहीसा मऊ होतो. यात दुसरा प्रकार म्हणजे मिठाचं पाणी करून त्यात भाज्या बुडवून ठेवणे. याला ‘ब्राईनिंग’ असंही म्हणतात.याचीच पुढची पायरी म्हणजे पिकलिंग. आपल्याला माहिती आहे पिकल म्हणजे लोणचं; पण आपलं लोणचं आणि जगभरात ज्याला ‘पिकल’ म्हणतात ते, यात बराचसा फरक आहे. आपल्या लोणच्यात कुटलेले मसाले, तेल, मीठ, साखर असे घटक असतात. तर जगभरात मीठ, विनेगर, तेल, काही ठिकाणी साखर, अख्खे म्हणजेच खडे मसाले, अशा घटकांचा वापर होतो. पुढील काही लेखांत आपण ‘पिकलिंग’ याविषयी वाचणार आहोत. त्यामध्ये पिकलिंगचा इतिहास अन् जगभरातील निरनिराळे प्रकार, या गोष्टी येतीलच. आपण लोणच्यांची दुकानं सर्रास पाहतो; पण हे फक्त आपल्याकडेच नसतं. तुर्कीमधे पिकल्सची खूप मोठमोठी दुकानं आहेत. म्हणजे अशा मोठ्या खोल्यांमध्ये वर छतापासून खाली जमिनीपर्यंत लाकडी कपाटात काचेच्या लहान-लहान बरण्यांमधे पिकल्स ठेवलेली असतात. ही पिकल्स ऑलिव्ह, गर्किन, लहान काकड्या, मिरच्या, भोपळी मिरच्या, टोमॅटो, कांदे, बीटरूट आदींच्या फोडी विनेगर, ऑलिव्ह तेल अन् काही विशिष्ट मसाल्यांच्या मिश्रणात मुरवलेल्या असतात. 

विशेष बाब म्हणजे तिथे नुसतं पिकल ज्यूस लहानशा ग्लासमधून प्यायला देतात. ज्यांना आंबट-चिंबट खायला खूप आवडतं त्यांच्यासाठी ही अशी पिकल्सची दुकानं म्हणजे केवळ सुख आहेत. अशी दुकानं मध्यपूर्व देशांत अनेक ठिकाणी आहेत.या सगळ्याविषयीच आपण पुढील काही लेखांत जाणून घेणार आहोत. 

टॅग्स :foodअन्न