शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

पावसाळ्यात आपलं मन प्रसन्न होतंच पण आपलं घर मात्र कुबट आणि कोंदट वाटतेय का? या 7 युक्त्यांनी घरालाही देता येतो मान्सून टच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 18:57 IST

पावसाच्या प्रसन्न स्वभवाप्रमाणे आपलं घरही आपण छान हिरवंगार आणि प्रसन्न करू शकतो.

 

 

-सारिका पूरकर-गुजराथी

 

‘धुंद आज वेली...धुंद फुलं-पाने’ असेच चित्र, असाच फ्रेशनेस आता पाऊस आपल्यासोबत घेऊन येणार आहे. अवघ्या सृष्टीवर हिरवाईचा साज चढवून पाऊस येतोय.. उन्हाळा सरता सरताच आपलं मन पावासासाठी सज्ज झालेलं असतं. पण पावसाच्या हसऱ्या-नाचऱ्या स्वागतासाठी तुमचं घरही तुमच्याऐवढच सज्ज असतं का? पावसाळा म्हटलं की बाहेर नाही म्ह्टलं तरी वातावरण कुंदच असतं. पण म्हणून घराचाही लूकही कुंदच असला पाहिजे असं नाही. पावसाच्या स्वभवाप्रमाणे आपलं घरही आपण छान हिरवंगार आणि प्रसन्न करू शकतो.

 

१) सुगंधित कॅण्डलस

 

पावसाळा म्हटलं की सगळीकडे पाणी साचून चिखल तयार होतो. कचरा कुजतो. त्यामुळे सतत दुर्गंधी निर्माण होते. मातीचे पाय घरात येतात. त्यामुळेही कुबट वास सतत घरात पसरतो. आजूबाजूला माशा, चिलटे घोंगावतात त्या वेगळ्या. अशा परिस्थितीत तुम्हाला छान आल्हाददायक वातावरण हवं असेल तर घरात सुगंधित कॅण्डल्स लावा. या कॅण्डल्स लावण्यासाठी तुम्ही घरातील सेंटर टेबल, वॉल युनिटचे डेस्क याचा वापर करु शकता. किंवा फ्लोटिंग कॅण्डल्स लावू शकता. कॅण्डल्स स्टॅण्डही मिळतात. ते देखील वापरु शकता. सुगंधित कॅण्डल्स अनेक प्रकारच्या सुगंधात मिळतात. त्यामुळे घरात छान सुगंध दरवळून कुबट वास कमी होण्यास मदत मिळेल. शिवाय डिझायनर कॅण्डलमुळे वेगळा लूकही येईल.

 

२) रेनकोट स्टॅण्ड

 

पावसात भिजून घरी आलं की ओले रेनकोट्स, छत्र्या ठेवायच्या कुठे? हा प्रश्न नेहमीच सतावतो. कारण एकतर यामधून सारखं पाणी गळत असतं. घर लहान असेल, घराला गॅलरी नसेल तर मग हा प्रश्न अजूनच बिकट होतो. यावरही डेकोरोटिव्ह पर्याय आहे. होय, ओले रेनकोट्स ठेवण्यासाठीही तुम्ही क्रिएटिव्हिटीची जोड देऊ शकता. सोपं आहे, घरात जुना प्लॅस्टिकचा ड्रम असेल किंवा मोठा डबा असेल तर त्याला प्लेन सोनेरी रंग देऊन टाका. चांगला वाळू द्या, नंतर त्यावर वॉर्निश लावा. पुन्हा वाळू द्या. आता हा ड्रम घरात एका कोपऱ्यात ठेवा. त्यात ओले रेनकोट्स आणि छत्र्या ठेवत जा. दिसायलाही एक कॉर्नर पीस म्हणून छान दिसेल आणि तुमची सोयही होऊन जाईल. ड्रम नसेल तर बाजारात मोठं रांजण मिळतात ते देखील वापरता येतील. आणखी डेकोरेटिव्ह हवं असेल तर विविध आकाराच्या रेडिमेड बास्केट्स, कंटेनर्स (मोठे ) मिळतात, त्याचा वापरही करता येतो.

 

३) इनडोअर रोपं

 

पावसाळा आणि हिरवाई, पावसाळा आणि सृजन, पावसाळा आणि नवजीवन हे अतूट नातं आहे. घरातही तुम्ही हा ग्रीन टच सजावटीला देऊ शकता. भरपूर इनडोअर रोपं घरात आणा आणि त्याची आकर्षक मांडणी करा. पेंटिंग्ज, फ्रेम्स यात देखील हिरव्या रंगाला प्राधान्य द्या. यामुळे घर देखील पावसाच्या तालावर डोलतय की काय असा भास होईल.

 

 

 

 

४) प्रसन्न स्लिप कव्हर्स

 

घरातील फर्निचरचा लूकही पावसाळ्यात बदलवता येतो. नाही, फार झंझट नाहीये त्यात. सोफे, खुर्च्या या पावसाळ्यात खराब होऊ नयेत, त्यावर ओलावा निर्माण होऊ नये म्हणून घेतलेली ही खबरदारी असते. पण त्यामुळे फर्निचरला आणि घराला नवीन लूक मात्र सहज मिळतो. म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारल्यासारखेच झाले ना ! तर सोफे, खुर्च्या, बेड्स यांच्यासाठी रेडिमेड मिळणारे स्लिप कव्हर्स आणा आणि फर्निचरला घालून टाका. आकर्षक रंगात, डिझाईन्समध्ये हे कव्हर्स मिळतात. दिसायलाही सुंदर दिसतात. भिंतींच्या रंगसंगतीप्रमाणे घेतले तर अजून छान. नाही तर खाकी, व्हाईट, आॅफ व्हाईट, निळसर राखाडी, मरुन, लाईट ब्राऊन हे रंग आॅल टाईम हिट आहेत.

 

५) ब्राईटनेस वाढवा

 

मोबाईल स्क्रिन, टीव्हीचा ब्राईटनेस वाढवला की चित्र कसं छान दिसतं. तसंच घराचंही आहे. या पावसाळ्यात घरालाही ब्राईट लूक द्या. पेस्टल, मरुन, काळा, पांढरा, हे नेहमीचे, तेच ते रंग बाजूला सारा. कुशन्सवर केशरी, पिवळा, लाल, निळा, हिरवा या रंगांचे कव्हर्स घाला. आकर्षक डिझाईन्स निवडा. चार्मिंग लूक मिळेल. घरातही मान्सूून खऱ्या अर्थानंन सेलिब्रेट होईल.

 

६) आकर्षक डोअर मॅट्स

 

पावसात भिजून आल्यावर बुट, सॅण्डल्सचे पाय पुसण्यासाठी आकर्षक डोअरमॅटस ठेवा. भरपूर पॅटर्नस आणि विविध रंगात त्या उपलब्ध असतात. शक्य झाल्यास दोन मॅट्स दाराजवळ ठेवा. एकावर बुटाचे पाय ठेवण्यासाठी आणि दुसरी फक्त ओले पाय पुसण्यासाठी म्हणजे मॅटवरील माती, चिखल पायांना लागणार नाही. याबरोबरच घरात इतरत्रही सुंदर मॅट्स, रग ठेवा. बेडरुममध्ये बेडजवळ, मुलांच्या खोलीत, गॅलरीत याठिकाणी मॅट्स हव्यातच. नाहीतर मातीचे पाय थेट बेडवर जातात. यामुळे स्वच्छता तर राखली जाईलच शिवाय मॅॅट्समुळे खोलीची थोडी सजावटही होते. आणखी एक घरातील महागडे कार्पेट्स प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून ठेवा. त्याऐवजी सुतळी, जाड दोरी, जाड धागे (ज्यूट, कॉईर ) या नैसर्गिक धाग्यांपासून बनलेले रग, मॅट्स अंथरा. धुवायला सोपे आणि दिसायलाही छान.

 

 

७) पारदर्शक पडदे

 

पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश कमी होतो. साहजिकच त्यामुळे एक डलनेस आपण अनुभवतो. मात्र जो काही थोडाफार सूर्यप्रकाश मधून-मधून येतो, तो तुमच्या घरात येऊन घराला फ्रेश ठेवू शकतो. त्यासाठी घरातील गडद रंगाचे, विविध फेब्रिकचे पडदे बदलवून टाका. नसतील बदलायचे तर त्याच्या आतून जाळीचे, पारदर्शक कापडाचे, फॅन्सी लेस लावलेले पडदे बसवा. यामुळे सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा घरात येईल आणि घरातील कुबट वास दूर होऊन प्रसन्नता येईल.