शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Uric Acid वाढलं असेल तर रोज खाणं सुरू करा ही चटणी, जाणून घ्या कशी बनवाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 09:52 IST

Green Chutney for Uric Acid Control: एक हिरवी चटणी तुमच्या कामात येऊ शकते. याच्या सेवनाने यूरिक अ‍ॅसिड कमी होतं. ही खास चटणी पदीना आणि कोथिंबीरपासून तयार केली जाते.

Green Chutney for Uric Acid Control:  यूरिक अ‍ॅसिड हा एक अपशिष्ट पदार्थ आहे जो प्यूरिन असलेल्या पदार्थांचं सेवन केल्याने शरीरात तयार होतो. यूरिक अ‍ॅसिड सामान्यपणे किडनीद्वारे फिल्टर करून शरीरातून बाहेर काढलं जातं. पण जेव्हा यूरिक अ‍ॅसिड प्रमाणापेक्षा जास्त वाढलं असेल तर किडनी त्याला योग्यपणे फिल्टर करू शकत नाही. अशात शरीरात यूरिक अ‍ॅसिड सगळीकडे पसरू लागतं. याचे क्रिस्टल हात-पायांच्या जॉईंट्समध्ये जमा होतात आणि सूजेचं कारण बनतात. अशात आहारात काही गोष्टींचा समावेश करून यूरिक अ‍ॅसिड कमी केलं जाऊ शकतं. यात एक हिरवी चटणी तुमच्या कामात येऊ शकते. याच्या सेवनाने यूरिक अ‍ॅसिड कमी होतं. ही खास चटणी पदीना आणि कोथिंबीरपासून तयार केली जाते. चला जाणून घेऊ याचे फायदे आणि चटणीची रेसिपी.

यूरिक अ‍ॅसिड कमी करणारी चटणी

यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी ही चटणी तुम्ही सहजपणे घरी तयार करू शकता. या चटणीमध्ये अनेक आयुर्वेदिक गुण असतात, जे यूरिक अ‍ॅसिड शरीरातून कमी करू लागतात. ही चटणी तयार करण्यासाठी कोथिंबीर, लसूण, पदीना, लिंबाचा रस, आलं आणि जिऱ्याची गरज लागेल.

कशी बनवाल ही चटणी?

कोथिंबीर आणि पदीन्याची चटणी बनवण्यासाठी आधी समान प्रमाणात कोथिंबीर आणि पदीन्याची पाने चांगली स्वच्छ धुवून घ्या. ही पाने मिक्सरमध्ये टाका. त्यात ३ ते ४ लसणाच्या कळ्या, आल्याचा छोटा तुकडा, थोडा लिंबाचा रस, अर्धा चमचा जिरे आणि टेस्टनुसार काळं मीठ टाकून बारीक करा. तुमची पदीन्याची चटणी तयार आहे. या चटणीच्या सेवनाने जेवणाची टेस्ट तर वाढेलच, सोबतच शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतील. यूरिक अ‍ॅसिडची समस्या असणाऱ्या लोकांनी ही चटणी रोज चपाती किंवा पराठ्यांसोबत सेवन करावी. या चटणीने यूरिक अ‍ॅसिडमुळे वाढलेली हात-पायांवरील सूजही कमी होते.

इतर काही उपाय

- हाय यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी लिंबाचा रसही पिऊ शकता. थंड लिंबू पाणी पिण्याऐवजी हलक्या कोमट पाण्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका आणि याचं सेवन करा. व्हिटॅमिन सी भरपूर असलेल्या लिंबू पाण्याने यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मदत मिळते.

- चेरीज खाऊनही यूरिक अ‍ॅसिडचं प्रमाण कमी करता येऊ शकतं. तुम्ही चेरीजचा ज्यूसही सेवन करू शकता. यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण भरपूर असतात. तसेच यात फायबरही असतं. ज्यामुळे यूरिक अ‍ॅसिडचा प्रभाव कमी होतो.

- एक ग्लास पाण्यात २ चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर सेवन करू शकता. अ‍ॅपल व्हिनेगरने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. तसेच याने यूरिक अ‍ॅसिडही कमी होतं.

- आल्याच्या सेवनाने यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यास फायदा मिळतो. आल्यामध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण भरपूर असतात ज्यामुळे सूजही कमी होते.

- हळदीमध्येही अनेक औषधी गुण असतात. त्यामुळे आहारात वेगवेगळ्या पद्धतीने हळदीचा समावेश करा. यानेही यूरिक अ‍ॅसिड कमी होण्यास मदत मिळते.

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स