शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चॉकलेट माझा मोदक : लोकप्रिय फूड ब्लॉगर सोनाली राऊत यांची चविष्ट 'चॉकलेट माझा मोदकांची' रेसिपी, नक्की ट्राय करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 19:35 IST

'लोकमत' आणि 'माझा' एकत्र येऊन 'माझा मोदक स्पर्धे'च्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि लाईव्ह कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. माझा मोदक रेसिपी शो हा घरबसल्या लाईव्ह पाहता येणार आहे.

गणपतीच्या पहिल्या दिवशी तर उकड काढून मोदक वळायला बसणं हा कार्यक्रम घरोघरी होतो. यंदाचा गणोशोत्सव खास करण्यासाठी आणि मोदक आणखी स्वादिष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी माझा मोदक रेसिपी शो घेऊन आलोय. 'लोकमत' आणि 'माझा' एकत्र येऊन 'माझा मोदक स्पर्धे'च्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि लाईव्ह कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. माझा मोदक रेसिपी शो हा घरबसल्या लाईव्ह पाहता येणार आहे.

महाराष्ट्रातील सुपर शेफ गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये या कार्यक्रमात  मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवत आहेत. २१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे. २१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे. प्रसिद्ध शेफनी या कार्यक्रमात सहभागी होऊन प्रेक्षकांना चवदार-चविष्ट मोदक करून दाखवले आहेत. 

आता फूड ब्लॉगर म्हणून लोकप्रिय असलेल्या सोनाली राऊत सहभागी झाल्या आहेत. सोनाली राऊत यांचा 'नमकशमक डॉट कॉम' नावाचा (Namakshamak.com) एक फूड ब्लॉग आहे. रुचकर मेजवानी या यूट्यूब चॅनेलवर होस्ट म्हणूनही काम केलं आहे. यासोबत त्यांचे स्वत:चे 'कूक विथ सोनाली' (Cook with Sonali Raut) असं हिंदी यूट्यूब चॅनल आणि बहिणीसोबत नमकशमक (Namakshamak) नावाचं इंग्रजी यूट्यूब चॅनल आहे. जिथे त्या नेहमी नवनवीन रेसिपी घेऊन येत असतात.  आज त्यांनी प्रेक्षकांना चॉकलेट माझा मोदक दाखवले आहेत. मग पाहा हा चविष्ट चवदार मोदकांचा व्हिडीओ.

चॉकलेट माझा मोदक

साहित्य:

१ कप डार्क चॉकलेट

१ टेबलस्पून दूध पावडर

३ टेबलस्पून किसलेले खोबरे

१ कप माझा ड्रिंक

कृती:

मोदकाचे सारण बनविण्यासाठी: 

गॅसच्या मंद आचेवर पॅन गरम करा.

१ कप माझा ड्रिंक पॅनवर ओतून घ्या.

१० मिनीट माझा ड्रिंकचे प्रमाण अर्धे होईपर्यंत गॅसवर गरम करा.

त्यात ३ टेबलस्पून किसलेले खोबरे आणि २ टेबलस्पून दूध पावडर घाला.

मिश्रणाचा मऊ गोळा होईपर्यंत ते ढवळत राहा.

मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या.

मोदक बनविण्यासाठी:

डार्क चॉकलेट १ मिनीट मायक्रोवेव्हमध्ये वितळवून घ्या.(चॉकलेट वितळवण्यासाठी तुम्ही डबल बॉयलरचा देखील वापर करू शकता)

साधारण रूमच्या तापमानावर येईपर्यंत चॉकलेट ढवळत राहा.

सिलिकॉन मोदक साच्यात वितळलेले चॉकलेट भरून घ्या.

साचा हळूच दाबून घ्या.

अधिकचे चॉकलेट सुरीच्या साहाय्याने काढून टाका.

साचा फ्रीजमध्ये पाच मिनिटांसाठी ठेऊन द्या.

उरलेले चॉकलेट भांड्यात ओतून घ्या.

साच्यातील प्रत्येक मोदकामध्ये माझाचे सारण भरून घ्या.

भांड्यातील चॉकलेट वापरून मोदक बंद करून घ्या.

माझाचे सारण मोदकामध्ये समप्रमाणात पसरावे यासाठी हळूच दाबा.

पुन्हा रेफ्रिजरेटरमध्ये १० मि. थंड होण्यासाठी ठेऊन द्या.

साच्यातून मोदक हळूच बाहेर काढून घ्या.

आपले चॉकलेट माझा मोदक आहेत तयार!

सोनाली राऊत यांनी केलेल्या स्वादिष्ट 'चॉकलेट माझा मोदक' ची रेसिपी पाहण्यासाठी  https://www.youtube.com/Lokmathttps://www.youtube.com/user/Indiafoodnetworkआणि Lokmat.com/MaazaModak या वेबसाईटला भेट द्या.

माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अ‍ॅमेझॉन इको प्लस (2nd generation).

 रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.

टॅग्स :Maaza Modak Recipesमाझा मोदक रेसिपीजfoodअन्नGanesh Chaturthi Recipesगणेश चतुर्थी रेसिपी