शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maaza Modak: लोकप्रिय शेफ योगिता बिले शिकवणार 'पुरणाचे माझा मोदक' रेसिपी; पाहा थोड्याच वेळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 15:07 IST

गणेशोत्सवानिमित्त माझा आणि लोकमतची माझा मोदक स्पर्धा

आपल्या चविष्ट खाद्यपदार्थांमुळे प्रसिद्ध असलेल्या लोकप्रिय शेफ योगिता बिले आज आपल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. योगिता आज प्रेक्षकांना खास 'पुरणाचे माझा मोदक' करून दाखवणार आहेत. मांगल्याचे प्रतिक असलेला सर्वांचा गणपती बाप्पा घरोघरी विराजमान झाला आहे. मात्र यंदा सर्वच सणांवर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळेच गणेशोत्सवही अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे.  गणरायाच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. लाडक्या बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. विघ्नहर्त्याला घरीच आपल्या हाताने तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य हा घरोघरी हमखास केला जातो. 

गजाननाची मनोभावे पूजा केली जात आहे. हल्ली विविध पद्धतीचे मोदक केले जातात. उकडीच्या मोदकांसोबतच चॉकलेट मोदक, रवा मोदक, ड्रायफ्रूट्स मोदक, तळलेले मोदक करण्याकडे गृहिणींचा अधिक कल असतो. गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी 'लोकमत' आणि 'माझा' एकत्र येऊन 'माझा मोदक स्पर्धे'च्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि लाईव्ह कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. यंदाचा गणोशोत्सव खास करण्यासाठी आणि मोदक आणखी स्वादिष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी माझा मोदक रेसिपी शो घेऊन आलोय. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुपर शेफ गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवत आहेत. 

२१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे. माझा मोदक रेसिपी शो हा घरबसल्या लाईव्ह पाहता येणार आहे. योगिता बिले आपल्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांमुळे प्रसिद्ध आहेत. देशाच्या विविध भागातील अनेक पारंपरिक पदार्थ आजच्या नवीन पिढीला माहीत नाहीत. ते लोप पावत आहेत. हे पदार्थ सर्वांना माहीत व्हावेत यासाठी योगिता यांनी स्वत:च एक युट्यूब चॅनल सुरू केलं आहे. 

योगिता बिले यांचं योगिताज किचन (Yogita's Kitchen) या नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे. २०१७ मध्ये त्यांनी याला सुरुवात केली असून स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे २७० हून अधिक व्हिडीओ प्रसारीत झालेले आहेत. योगिता बिले यांचं सासर आणि माहेर दोन्ही तळकोकणातील कुडाळ येथील असल्याने कोकणच्या संस्कृतीमध्ये पाककृती तयार करण्याचे धडे लहानपणापासून त्यांनी घेतले आहेत. त्यांचे वडील हॉटेल व्यावसायिक तर विवाहानंतर पतीची अनेक ठिकाणी बदली झाल्याने विविध प्रांतातील पाककृती शिकण्याची संधी त्यांना मिळाली. आपल्या खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय असलेल्या योगिता बिले प्रेक्षकांना आज खास 'पुरणाचे माझा मोदक' करून दाखवणार आहेत. 

योगिता बिले यांच्या 'पुरणाचे माझा मोदक' ची रेसिपी पाहण्यासाठी दुपारी ४ वाजता https://www.youtube.com/Lokmathttps://yogitaskitchen.com/ आणि Lokmat.com/MaazaModakया वेबसाईटला भेट द्या.

माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अ‍ॅमेझॉन इको प्लस (2nd generation).

 रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवfoodअन्न