शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

इम्युनिटी बुस्टर आहे लापशीचा हलवा...एकदा ट्राय करून बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 14:40 IST

लापशीच्या हलव्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कोरोनाकाळात आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर लापशीचा हलवा तुमच्यासाठी उत्तम उपाय आहे.

लापशी हा असा पदार्थ आहे जो कोणत्याही घरात अगदी सहज मिळून जातो. त्याची खीर सर्वांनाच आवडते पण त्याचा हलवा खूपच चविष्ट लागतो. हा हलवा खायला चविष्ट तर आहेच पण त्याचे फायदे भरपूर आहेत. या हलव्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कोरोनाकाळात आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर लापशीचा हलवा तुमच्यासाठी उत्तम उपाय आहे.

न्युट्रीशनिस्टचं मत काय?प्रसिद्ध न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांच्या म्हणण्यानुसार लापशीचा हलवा दूध, साखर, सुकामेवा आणि केशरने बनवला जातो. त्यामुळे भूक वाढते आणि लवकर पोटही भरते. आपल्या घरात कुणी आजारी पडलं तर त्याला लापशीचा हलवा द्यावा.त्या पुढे असंही म्हणाल्या की घरातील पुजेच्या वेळी प्रसाद म्हणून हा हलवा दिला जातो. त्याचप्रमाणे ही पूजा जेव्हा जेव्हा नवीन मोसम सुरु होतो तेव्हा केली जाते. त्याचवेळी हा हलवा बनवण्याचं कारण म्हणजे बदलत्या मोसमानुसार योग्य आहार शरीराला मिळावा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावी.

कसा बनवाल लापशीचा हलवा?साहित्य१ वाटी लापशी, १ वाटी साखर, ४ वाटी पाणी, अर्धा कप तूप, थोडीशी वेलची पावडर, बदाम आणि काजूचे तुकडे.

कृतीकढईमध्ये तुप घालुन लापशी खरपूस भाजून घ्या. त्याचा रंग थोडा लालसर झाला की त्यात पाणी टाका, पाणी आटेपर्यंत हलवा ढवळत राहा. त्यात साखर टाकून विरघळेपर्यंत शिजवत रहा. साखर विरघळली त्यात थोडी वेलची पावडर टाका. गॅस बंद करून त्यात बदाम व काजू घाला. झाला सुजी हलवा तयार. 

 

टॅग्स :foodअन्नReceipeपाककृती