जेवणात रोज काय काय नवनवीन करावं. असा प्रश्न घरोघरच्या महिलांना पडत असतो. कारण त्याच त्याच भाज्या आणि पाककृती ट्राय करून महिलांना आणि ते खाऊन घरातल्या मंडळींना कंटाळा आलेला असतो. जर तुम्ही सुध्दा असा विचार करत असाल तर एक नवीन रेसिपी आज तुम्हाला सांगणार आहोत. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून जास्त कोणताही खर्च न करता जेवणासाठी तुम्ही ही भाजी तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कशी तयार करायची पाटवड्यांची भाजी.
साहित्य :- हरभरा डाळीचं पिठ १ वाटी २ कांदे , १ टोमॅटो लसूण ४-५ पाकळ्या ओल खोबरे कीसुन २-३ चमचे हळद , काळा मसाला ३ चमचा लाल तिखट १ चमचा मिठ , सुक खोबरे १/२ वाटी २ आल , कोथिंबीर तेल .
रस्साः-
कांदा, खोबर भाजून घ्या टोमॅटो कापून, लसूण पाकळ्या ,आल ह्याच सर्व मिक्सर मध्ये बारीक वाटण करा.
कढईत तेल टाकून १ बारीक चिरुन कांदा घालून गुलाबी करुन वरील वाटण घाला. तेल सुटले की काळा मसाला & लाल तिखट हे घालून मिक्स करून त्यात पाणी घालून चागंले ऊकळून घ्या रस्सा गरम , उकळता ठेवावा.
ही भाजी वाढताना आधी दोन वड्या ठेवून त्यावर रस्सा घालावा. खोबरं-कोथिंबीर पेरून किंवा आवडीप्रमाणे ही भाजी भाताबरोबर , भाकरी , चपाती सोबत खावी.
(सौजन्य-bred butter)