शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
2
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
3
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
4
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
5
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
6
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
7
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
8
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
11
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
12
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
13
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
14
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
15
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
16
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
17
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
18
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
19
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
Daily Top 2Weekly Top 5

तोंडाला पाणी सुटेल, असे खमंग ब्रेड रोल्स... नक्की करुन बघा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 12:01 IST

आज रविवार! सकाळी सकाळी नाष्ता काय बनवायचा असा विचार प्रत्येक घरातील महिलांच्या डोक्यात चालला आहे.

आज रविवार! सकाळी सकाळी नाष्ता काय बनवायचा असा विचार प्रत्येक घरातील महिलांच्या डोक्यात चालला आहे. आठवड्यातले सगळे दिवस पोहे, उपमा खाऊन कंटाळलेल्या घरातल्या मोठ्यांना तसचं बच्चे कंपनीला काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होत असते. त्याचप्रमाणे ऐरवी सकाळीच कामासाठी बाहेर पडणाऱ्या महिला आज घरी असल्यामुळे त्यांना घरातल्या मंडळींची फर्माईश पूर्ण करावी लागणार. जर तुम्ही सुध्दा असा विचार करत असाल, तर झटपट तयार होणारी एक आगळीवेगळी रेसिपी आज तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कशी तयार करायची ब्रेड रोलची रेसिपी. 

साहीत्यः४ मोठे बटाटे१ टे. स्पू बारीक चिरलेली कोथिंबीर१/२ लिंबाचा रस६-८ ब्रेड स्लाईसेसवाटणासाठी१ इंच आलं४ मोठ्या लसूण पाकळ्या३-४ हिरव्या मिरच्या१ टि. स्पू. धने१ टि. स्पू. जीरे१ टि. स्पू. बडिशेप

कव्हरसाठी:१ कप डाळीचं पीठ१ मोठा चमचा तांदळाचं पीठ१ टि. स्पू. तिखट१/२ टि. स्पू. हळदचिमूटभर हिंग१ छोटा चमचा आलं लसूण पेस्टचवी प्रमाणे मीठ

हिरवी चटणी:एक छोटी कोथिंबीरीची जुडीमूठभर पुदिना पानं१-२ पाकळ्या लसूण१/२ इंच आलं३-४ हि. मिरची१ टि. स्पू. जीरे१/२ टि. स्पू. अनारदाणे (असल्यास)पाव लिंबाचा रसचवीप्रमाणे मीठतळायला तेलगोड चटणीबारीक चिरलेला कांदाबारीक शेव

कृती: हिरव्या चटणीसाठी दिलेले साहित्य बारिक वाटून घ्या. चटणी बाजूला ठेवा.डाळीच्या पीठात सर्व साहित्य घालून भजींच्या पीठाप्रमाणे सरबरीत भिजवून घ्या पण खूप पातळ करू नका.बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या.वाटणासाठी दिलेले सर्व पदार्थ बारिक वाटून थोड्या गरम तेलात परतून घ्या. त्यातच हळद घाला.बटाट्यामधे तेलात परतलेले वाटण, मीठ, बारिक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा.ब्रेडच्या कडा काढून  स्लाईस लाटण्यानं लाटून घ्या.ब्रेडला हिरवी चटणी लावून बटाट्याचे सारण एका कडेला ठेवून दुसरी बाजू त्यावर घडी घालून पॅटीस सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करून घ्या.डाळीच्या पीठात बुडवून तळून घ्या.तळलेल्या पॅटीसचे तिरके काप करून घ्या.त्यावर मीठ, धने-जीरे पूड, तिखट घालून थोडी गोड चटणी घाला.कांदा घालून वरून बारीक शेव घाला. तयार आहेत ब्रेड रोल . हा पदार्थ तुम्ही सॉस किंवा चटणी सोबत खाऊ शकता.

(सौजन्य- maayboli)

टॅग्स :foodअन्नReceipeपाककृती