शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Recipe For Ganesh Festival : आरोग्यासाठी पौष्टिक अन् खाण्यास चविष्ट अशी 'गव्हाची खीर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 11:51 IST

घराघरांत गणरायाचे आगमन झाले असून त्याचे आदरातिथ्य करण्यासाठी घरात गोड पदार्थांची रेलचेल सुरू आहे. अशातच बाप्पाच्या नैवेद्यासाठी नवनवीन पदार्थ करण्याच्या विचारात असाल आणि काही पर्याय सुचत नसेल तर आज आम्ही तुम्हाला एका खास पदार्थाबाबत सांगणार आहोत. 

घराघरांत गणरायाचे आगमन झाले असून त्याचे आदरातिथ्य करण्यासाठी घरात गोड पदार्थांची रेलचेल सुरू आहे. अशातच बाप्पाच्या नैवेद्यासाठी नवनवीन पदार्थ करण्याच्या विचारात असाल आणि काही पर्याय सुचत नसेल तर आज आम्ही तुम्हाला एका खास पदार्थाबाबत सांगणार आहोत. आज आम्ही जी रेसिपी सांगणार आहोत ती थोडीशी युनिक असून आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आहे. महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवात काही घरात हा पदार्थ हमखास तयार करण्यात येतो. चविष्ट आणि पौष्टिक असा हटके पदार्थ म्हणजे, गव्हाची खीर. 

गव्हाची खीर तयार करण्यासाठी लागणारं साहित्य : 

  • 200ग्रॅम गव्हाची कणी कंवा दलिया 
  • 2 चमचे तूप 
  • 10-12 मणुके किंवा इतर ड्रायफ्रुट्स 
  • चिमुटभर वेलची पावडर 
  • 200 ग्रॅम गुळ किंवा गुळाची पावडर 
  • दूध

 

अशी तयार करा गव्हाची खीर : 

- जर तुम्ही दलियाचा वापर करणार असाल तर साधारणतः तासाभरासाठी पाण्यात भिजत ठेवा. जर गव्हाचा वापरत असाल तर सर्वात आधी गहू पाण्यात भिजत ठेवा आणि त्यानंतर जाडसर वाटू घ्या. 

- एका कढईमध्ये तूप गरम करत ठेवा. आता त्यामध्ये दलिया एकत्र करून परतून घ्या. 

- आता यामध्ये मणुके किंवा तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स एकत्र करा. तसेच वेलची पूज आणि काजूची पावडर व्यवस्थित एकत्र करून घ्या. 

- गुळ एकत्र करून घ्या आणि एक मिनिटासाठी शिजवून घ्या. 

- मिश्रणात एक कप पाणी एकत्र करा. मिश्रण सतत एकत्र करत राहा. त्यामुळे मिश्रण एकजीव होण्यास मदत होईल. 4 ते 5 मिनिटांसाठी मिश्रण एकजीव करा. 

- मंद आचेवर मिश्रण एकजीव केल्यानंतर त्यामध्ये हळूहळू दूध एकत्र करा आणि तोपर्यंत शिजवून घ्या, जोपर्यंत ते व्यवस्थित एकजीव होत नाही. 

- मिश्रण व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करा

- पौष्टिक आणि चविष्ट गव्हाची खीर तयार आहे. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवGanesh Chaturthi Recipesगणेश चतुर्थी रेसिपीReceipeपाककृती