शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

Ganesh Chaturthi 2019 : बाप्पासाठी 'हे' 5 प्रकारचे मोदक आहेत खास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 13:58 IST

Ganesh Chaturthi 2019 : एखादं नवीन काम सुरू करण्याआधी श्रीगणेशाची पूजा करण्यात येते. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाला मोदक फार आवडतात. अशातच बाप्पा घरी आला की त्याला नैवेद्य दाखवण्यासाठी घराघरांमध्ये मोदक केले जातात.

Ganesh Chaturthi 2019 : एखादं नवीन काम सुरू करण्याआधी श्रीगणेशाची पूजा करण्यात येते. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाला मोदक फार आवडतात. अशातच बाप्पा घरी आला की त्याला नैवेद्य दाखवण्यासाठी घराघरांमध्ये मोदक केले जातात. पण अनेकजण बाजारातून मोदक विकत आणले जातात. सणासुदीच्या काळात बाजारामध्ये अनेकदा भेसळयुक्त पदार्थही मिळतात असं आपण अनेकदा ऐकतो. अशावेळी बाप्पाचा नैवेद्य घरीच तयार केला तर भेसयुक्त पदार्थांपासून आपण दूर राहू शकतो. 

अनेकदा घरी नैवेद्यासाठी उकडीचे मोदक तयार करण्यात येतात. पण बाप्पाला दररोज उकडीच्या मोदकांचाच नैवेद्य दाखवण्याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार करून त्यांचा नैवेद्य दाखवू शकता. जाणून घेऊया बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास मोदकांचे प्रकार..

1. पारंपरिक उकडीचे मोदक

तांदळाच्या पिठापासून तयार करण्यात आलेल्या या मोदकांमध्ये खोबरं आणि गूळाचं सारण भरण्यात येतं. त्यानंतर हाताने किंवा साच्यामध्ये टाकून तुम्ही याला मोदकाचा आकार देऊ शकता. त्यानंतर हे मोदक वाफवून घ्यावे. खाण्यासाठी चविष्ट असे उकडीचे मोदक तयार आहेत. 

2. फ्राय मोदक 

पारंपारिक मोदकांपेक्षा हटके स्टाइलने मोदक तयार करायचे असतील तर तुम्ही फ्राइड मोदक तयार करू शकता. यासाठी तांदळाचं पिठ आणि गुळ, खोबऱ्यासोबत मोदक तयार करून त्याला तेल किंवा तूपामध्ये तळून घ्यावे. 

3. चॉकलेट मोदक

चॉकलेट म्हटलं की, लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. बाप्पासाठीही तुम्ही चॉकलेटचे मोदक तयार करू शकता. हे मोदक कंडेन्स मिल्क आणि कोको पावडरपासून तयार करण्यात येतात. 

4. मोदक पेढा

केसर पेढा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोदक पेढाही तयार करू शकता. त्यासाठी तुम्ही आधी घरच्या घरी केसरचा पेढा तयार करून घ्या. नंतर मोदकाच्या साच्याचा वापर करून त्याला मोदकाचा आकार देऊ शकता. 

5. चॉकलेट आणि खोबऱ्याचे मोदक

चॉकलेट आणि नारळापासून तयार करण्यात आलेला मोदक फर कमी वेळात तयार होणारा पदार्थ आहे. खोबरं आणि साखरेच्या सारणाचा मोदक तयार करू शकता.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवReceipeपाककृतीGanpati Festivalगणेशोत्सवGanesh Chaturthi Recipesगणेश चतुर्थी रेसिपी