शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh chaturthi 2019 : घरीच झटपट तयार करा मोतीचूरचे लाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 16:19 IST

संपूर्ण देशभरात गणेशोत्सव उत्साहाने साजरा होत आहे. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायाचे घराघरांमध्ये आगमन झाले आहे. अशातच आपल्या लाडक्या बाप्पाला त्याच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यासाठी गोडाच्या पदार्थांची रेलचेल सुरू आहे.

संपूर्ण देशभरात गणेशोत्सव उत्साहाने साजरा होत आहे. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायाचे घराघरांमध्ये आगमन झाले आहे. अशातच आपल्या लाडक्या बाप्पाला त्याच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यासाठी गोडाच्या पदार्थांची रेलचेल सुरू आहे. अनेकदा कामाची धावपळ आणि नैवेद्य तयार करण्यासाठी लागणारा वेळ यामुळे हे पदार्थ बाजारातून विकत आणले जातात. पण जर हेच पदार्थ तुम्ही तुमच्या हातांनी तयार केले तर त्याचं महत्त्व आणखी वाढतं. अशातच बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखविण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये मोतीचूरच्या लाडूचा आवर्जुन समावेश करण्यात येतो. जाणून घेऊयात मोतीचूरचे लाडू तयार करण्याची रेसिपी... 

साहित्य :

  • बेसन 60 ग्रॅम
  • केसर 
  • साखर अर्धा कप
  • दूध 2 चमचे
  • तेल किंवा तूप आवश्यकतेनुसार
  • पिस्ता किंवा बदामाचे तुकडे

 

कृती :

- अर्धा कप बेसन आणि पाणी एका बाउलमध्ये घेऊन एक पेस्ट तयार करा. लक्षात ठेवा त्यामध्ये गुठळ्या ठेवू नका. त्यासाठी हे मिश्रण एका चाळणीने चाळून दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्या. 

- एका पॅनमध्ये साखर आणि पाणी टाकून त्याचा पाक तयार करण्यासाठी ठेवा. साखर पूर्ण विरघळल्यानंतर त्यामध्ये थोडं दूध टाकून थोडा वेळ शिजवून घ्या. त्यानंतर  पाक तयार करा. 

- एका कढईमध्ये आवश्यकतेनुसार, तेल किंवा तूप मध्यम आचेवर गरम करा. बेसनापासून तयार केलेल्या मिश्रणामध्ये छोट्या-छोट्या छिद्रांचा झारा बुडवा आणि कढईवर नेऊन हलकेच झटका द्या. जेणेकरून बेसनाचे छोटे छोटे थेंब कढईमध्ये पडतील. दुसऱ्या झाऱ्याने कढईतील बुंदी  एकत्र करा आणि पाकामध्ये टाका. 

- बेसनाच्या संपूर्ण मिश्रणाची बुंदी तयार करून घ्या. तयार बुंदी पाकामध्ये एक तासापर्यंत मुरण्यासाठी ठेवा. त्यानंतर पाकामधून काढून लाडू वळून घ्या. 

-  मोतीचूरच्या लाडूंचा नैवेद्य बाप्पसाठी तयार आहे. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवGanesh Chaturthi Recipesगणेश चतुर्थी रेसिपीReceipeपाककृती