शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
2
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
3
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
4
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
5
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
6
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
7
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
8
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
9
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
10
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
11
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
12
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
13
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
14
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
15
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
16
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
17
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
18
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
19
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
20
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू

Ganesh Chaturthi 2019 : चविष्ट अन् पौष्टिक, करायलाही सोपे असे खजुराचे लाडू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 13:25 IST

सणासुदीच्या काळात आरोग्यही जपायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला हटके रेसिपी सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला गणरायाच्या नैवेद्यासाठी हेल्दी आणि टेस्टी खजुराच्या लाडूची रेसिपी सांगणार आहोत.

सगळीकडे गणेशोत्सवाचा गाजावाजा सुरू असून घराघरात बाप्पाचे आदरातिथ्य करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि प्रसाद म्हणून वाटण्यासाठी अनेक गोडाचे पदार्थ तयार करण्यात येतात. अनेकदा वेळेअभावी हे पदार्थ बाजारातून आणले जातात. पण तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हटके पदार्थ नैवेद्य दाखवण्यासाठी आणि प्रसादासाठी तयार करू शकता. 

सणासुदीच्या काळात आरोग्यही जपायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला हटके रेसिपी सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला गणरायाच्या नैवेद्यासाठी हेल्दी आणि टेस्टी खजुराच्या लाडूची रेसिपी सांगणार आहोत. जाणून घेऊयात सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात घरच्या घरी तयार करता येणाऱ्या खजूराचे लाडू तयार करण्याची रेसिपी...

साहित्य :

  • एक कप खजूर
  • सुका मेवा ( बारिक कापलेले काजू, बदाम, पिस्ता,मनुके)
  • तीन चमचे मावा
  • एक कप दूध
  • एक कप साखर
  • अर्धा चमचा वेलची पावडर
  • दोन मोठे चमचे ओल्या नारळाचं खोबरं

 

कृती :

- सर्वात आधी खजूराच्या बिया काढून ते छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या. त्यानंतर हे तुकडे अर्धा कप दुधामध्ये भिजवून मिक्सरमधून बारिक करून त्याची पेस्ट तयार करा. 

- आता गॅसवर मध्यम आचेवर एक पॅन ठेवून त्यामध्ये तूप गरम करून घ्या. 

- तूप गरम झाल्यावर त्यामध्ये पिस्ता, खजूर आणि साखर टाकून जवळपास 5 मिनिटांपर्यंत परतून घ्या. तुम्ही साखरेऐवजी गूळही वापरू शकता. 

- मिश्रण चांगलं परतल्यावर त्यामध्ये मावा आणि दूध टाकून शिजवून घ्या. 

- त्यानंतर यामध्ये वेलचीची पावडर आणि बारिक केलेला सुका मेवा टाकून एकत्र करा आणि गॅस बंद करा.

- मिश्रण हाताल चिटकू नये म्हणून तळव्यावर थोडं तूप लावून घ्या.

- मिश्रण थोडं थंड झाल्यावर हाताने गोल लाडू वळून घ्या. 

- खोबऱ्यामध्ये लाडू घोळवून घ्या. 

- तयार आहेत बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक असे खजूराचे लाडू.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवGanesh Chaturthi Recipesगणेश चतुर्थी रेसिपीHealthy Diet Planपौष्टिक आहारReceipeपाककृती