शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

Food: हिवाळ्यातल्या सुकलेल्या फळांचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 14:35 IST

Food:

- भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकारहिवाळा हा ऋतू जसे आल्हाददायक वातावरण घेऊन येतो तसेच खाण्यापिण्याची चंगळ करतो. बाजारात ताज्या भाज्या, कंदमुळे, फळफळावळ याचबरोबर सुक्यामेव्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते. भारतातल्या कोणत्याही प्रांतात जा, हिवाळ्यात शरीर तंदुरुस्त आणि त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी सुकामेवा आणि त्याच्यापासून बनवलेले पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनतात. हजारो वर्षांपासून जगभरातल्या लोकांना तंदुरुस्त ठेवण्याचे काम सुकामेवा करतो आहे. असे म्हणतात की, झाडावरून खाली पडून वाळलेली फळे रुचकर लागतात आणि ऊर्जाही देतात याची जाणीव आदिमानवालाही झाली होती. 

मेसोपोटेमिया, ग्रीक, रोमन, भारतीय अशा अनेक प्राचीन नागर संस्कृतींमध्ये आहारात वाळवलेल्या फळांचा आणि फळांच्या बियांचा समावेश होता. सुमारे पाचेक हजार वर्षांपूर्वी आजच्या आखाती देशांच्या प्रदेशात खजुराच्या झाडांची लागवड सुरू झाली. खजुराला मोठ्या प्रमाणात फळ धरते. त्यामुळे खजुराचे उत्पादन वाढवून त्यापासून अनेक पदार्थ बनवण्यास सुरुवात झाली. अनेकदा इतर फळे सुकवताना ती खजुराबरोबर सुकवली तर खजुरातली साखर त्यांच्यात उतरते हे लक्षात आले आणि तशा पद्धतीने फळे सुकवण्यास सुरुवात झाली. अंजिराचा उपयोग तर खूप आधीपासून होत होता. अंजीर हे गरिबांचे शक्तिवर्धक खाद्य म्हणून प्रसिध्द होते. ग्रीक गुलाम आपली शक्ती टिकवून ठेवण्यासाठी अंजीर खात. 

सुक्यामेव्यात वाळवलेल्या पदार्थांबरोबरच फळांच्या बियांचाही समावेश होतो. इराणमध्ये सुरुवात झालेला बदाम आज जगभरात सगळ्यात जास्त लोकप्रिय सुकामेवा आहे. अमेरिका, इराण, तुर्कस्थान, मोरोक्को वगैरे देशांत बदामाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते, तर ब्राझीलमध्ये जन्मलेल्या काजूची लागवड करणाऱ्या देशांमध्ये भारत हा एक महत्त्वाचा देश आहे. हजारो वर्षांपूर्वी माणसाने सुकामेव्यातल्या घटकांचा शोध घेऊन कशात ओमेगा थ्री जास्त आहे, कोणत्या मेव्यात प्रोटीन जास्त आहे याचा शोध घेतला नव्हता, पण हे पदार्थ खाल्ल्याचे फायदे मात्र नोंदवून ठेवले, पुढच्या पिढीला सांगितले आणि त्याची लागवड, वापर सुरूच राहिला. पूर्वजांच्या हुशारीमुळे आजही हा मेवा आपल्याला उपलब्ध आहे. त्याचे योग्य सेवन ऋुतूनुसार केले तर नक्कीच फायद्याचे ठरेल. (bhalwankarb@gmail.com)

टॅग्स :foodअन्न