शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

Food: मलैयो - लोणी आणि सायीचा कापूस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 10:23 IST

Food: तुम्ही कधी कापसागत असणारा, तोंडात घालताच विरघळणारा अद्वितीय चवीचा पदार्थ खाल्लाय का ? नसेल, तर हा पदार्थ - मलैयो - खायला तुम्हाला वाराणसीला जावे लागेल आणि तेही कडाक्याच्या थंडीत!

- शुभा प्रभू साटम (खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक) 

तुम्ही कधी कापसागत असणारा, तोंडात घालताच विरघळणारा अद्वितीय चवीचा पदार्थ खाल्लाय का ? नसेल, तर हा पदार्थ - मलैयो - खायला तुम्हाला वाराणसीला जावे लागेल आणि तेही कडाक्याच्या थंडीत!

मलैय्यो म्हणजे भरपूर फेटलेले लोणी किंवा साय आणि त्यावर किसमिस / बदाम / पिस्ते, किंचित पिठीसाखर. बस. पदार्थ निव्वळ स्वर्गीय आणि अतुल्य चवीचा. अस्सल दुधाची घट्ट खापरासारखी साय  किंवा लोणी इतके फेटायचे की त्याचा पांढराशुभ्र कापूस व्हायला हवा. बुढ्ढी के बाल असतात तसे दिसायला लागले की, अगदी अलगदपणे द्रोणात भरायचे आणि द्यायचे.

वाराणसीच्या हिवाळ्यात  पहाटे ५ ते ११ याच वेळेत हा मलैयो मिळतो. सूर्य वर चढला की बंद. कारण मलैय्योचा पोत उन सहन करू शकत नाही आणि  हजारो पर्यटक हा खायला वाराणसीत डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असतात.

मोठाल्या द्रोणात पिंजलेल्या कापसासारखा हा मलैयो वरून बदाम पिस्त्याची पखरण पेहेनून येतो, सोबत लाकडी चमचा. वाटीमध्ये दिला जात नाही, वास्तविक चोखंदळ खाणारे फक्त बोटांनी हा उचलून खातात. जसे आपण श्रीखंड खातो तसेच! (स्पूनने श्रीखंड खाणे हा शुद्ध माठ प्रकार) मलैय्योचा घास घेतला की, एक अविस्मरणीय चव अलगद जिभेवर पसरत जाते. इथे चवीचा स्फोट नाही तर नजाकतीने चव चढते. आणि ती तशीच असायला हवी. पहाटेची झुंझुरक्याची वेळ, आजूबाजूच्या देवळातून ऐकू येणाऱ्या आरत्या, घंटा नाद, भणाणणारा गार वारा, आणि हातात येणारा हा मलैयो! - एका द्रोणात पोट भरते.

वाराणसीच्या चिंचोळ्या बोळकांड्या, गल्ल्या, चौक, ठिकठिकाणी हा पदार्थ विकणाऱ्या गाड्या दिसतील. असे म्हणतात की अस्सल मलैयो अगदी राम प्रहरी बाहेर ठेवतात, सकाळचे दंव पडायला लागले की, मग साय / लोणी फेटायला घेतले जाते, आता त्या दवबिंदूचे गारूड असावे की, काय पण बघता बघता एक देखणा ढग आकार घेतो. मलैय्यो खाऊन, चालता चालता वाटेत लागणाऱ्या मंदिरांना हात जोडत मग कोणत्याही कचोडी, पूडी, सब्जी विकणाऱ्या ठेल्यापाशी थांबायचे, तोपर्यंत सूर्य उगवलेला असतो... मग गोडमिट्ट चहा घेऊन नदी काठी बसून आयुष्याचा विचार करायचा!(shubhaprabhusatam@gmail.com)

टॅग्स :foodअन्न