शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

Food: अच्छी सुरत आणि खान्देशची कचोरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 15:19 IST

Food: खान्देशात एकेकाळी नाटकाचे मस्त दौरे व्हायचे. जळगाव मग धुळे आणि भुसावळ, असा दौरा असायचा. उन्हाळ्यात साधारण ४५ च्या आसपास तापमान असायचं. जिवाची तगमग म्हणजे काय ते त्यावेळी कळायचं. तंदुरी रोटीला काय वाटत असेल? याचा अंदाज यायचा; पण कधी- कधी थंडीच्या दिवसांत प्रयोग असायचे, तेव्हा मजा यायची.

संजय मोने, अभिनेतेखान्देशात एकेकाळी नाटकाचे मस्त दौरे व्हायचे. जळगाव मग धुळे आणि भुसावळ, असा दौरा असायचा. उन्हाळ्यात साधारण ४५ च्या आसपास तापमान असायचं. जिवाची तगमग म्हणजे काय ते त्यावेळी कळायचं. तंदुरी रोटीला काय वाटत असेल? याचा अंदाज यायचा; पण कधी- कधी थंडीच्या दिवसांत प्रयोग असायचे, तेव्हा मजा यायची. हवा उत्तम. प्रेक्षक फार छान असायचे. शिवाय प्रयोगही बाराच्या आसपास संपायचा. खान्देशात जेवण फार चविष्ट असतं. शेंगदाण्याचा वापर असतो मसाल्यात... जळगावला माझा एक अत्यंत घनिष्ठ मित्र राहायचा. भय्या उपासनी त्याचं नाव. आता तो नाही. माझ्या आयुष्यात तो अचानक आला. आम्ही दोघे रात्र-रात्र गप्पा मारायचो. साथीला त्याचे एक दोन मित्र, काही उत्तम द्रव्य. शेवभाजी आणि भरीत भाकरी ही त्याने खायला घातली तशी आता पुन्हा मिळाली नाही. बनतही असेल उत्तम; पण आता तो नाही. वांग्यांचे तेलात फोडणी करून तुकडे टाकायचे, दाण्याचे कूट, थोडा काळसर मसाला, मस्त झणझणीत तिखटाबरोबर भाकरी. ज्वारीची उन्हाळ्यात, तर बाजरीची थंडीत... वरती तेल आणि एक अगम्य चटणी. जेवणाच्या ताटात स्वर्ग यायचा. हुरडा-बिरडा हा प्रकार खाण्यापेक्षा दुसऱ्या दिवशी पोट बंड करून उठतं म्हणून मला फारसा आवडत नाही. असे इतरही पदार्थ आहेत... तर जळगावचा एक किस्सा.एका नाटकाचा प्रयोग होता. भैयाच्या घरी सकाळी नेहमीप्रमाणे पोहोचलो. जेवण उत्तम झालं. छानपैकी झोपही झाली. संध्याकाळी प्रयोगाला निघायचं म्हणून आवराआवर केली. अचानक भैया म्हणाला,‘चल कचोरी खाऊया.’ ‘कुठं?’ ‘इथं जवळच.’ आम्ही त्याच्या बुलेटवरून कचोरीवाल्याकडे पोहोचलो.भैया पुन्हा एकदा उद्गारला- ‘चेहरा आवडला नाही, तर कचोरी देत नाही हां तो.’ ‘म्हणजे?’ ‘म्हणजे तू त्याला कुरूप वाटलास तर कचोरी मिळणार नाही.’आरशात आपण नेहमी बघतोच. मला काळजी वाटायला लागली. जर मी त्याला कुरूप वाटलो तर? आणि हे सगळ्यांना कळलं तर? नकोच विषाची परीक्षा.‘मला तशी फार भूक नाहीये’ टाळायला म्हणून मी म्हणालो.भैया त्याचं नेहमीचं गडगडाटी हास्य करून म्हणाला- ‘आपण कसंही दिसत असलो तरी आपल्याला खायला मिळेल.’भैया रुबाबदार. त्यामुळं त्याला मिळाली असती कचोरी, प्रश्न माझ्या साजीऱ्या रूपाचा होता. गाडी त्या कचोरीवाल्याकडं थांबली. मस्त कचोरी. धने आणि बडीशेप बेसन घातलेली एकदम हलकी टम्म फुगलेली. त्यावर दोन प्रकारच्या चटण्या आणि दही. एकदम मधुर. कोथिंबीर पेरलेली. थोडा कापलेला कांदा. भसाभस संपवली. पैसे देऊन झाल्यावर भैयाने ओळख करून दिली. त्यावर तो कचोरीवाला म्हणाला- ‘अच्छी सुरत पायी हैं आपने, कभी भी आजाना!’ इतकं समाधान कधीही मिळालं नाही. आता माझ्या दिसण्याबद्दल मी निर्धास्त आहे.

टॅग्स :Sanjay Moneसंजय मोनेfoodअन्न