शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

Food: तुमच्या कॉफीत कॉफी आहे, की चिकोरी? नेमका काय प्रकार, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 11:37 IST

Food: कॉफीत कॉफी किती आणि चिकोरी किती, याचे प्रमाण कॉफी उत्पादकांनी स्पष्ट केले पाहिजे, ही बातमी वाचली आणि गंमत वाटली. फिल्टर कॉफी आणि चिकोरीचे नाते अगदी जुने आहे. गेल्या दोनशे वर्षांपूर्वीपासून कॉफीत चिकोरी मिसळून विकली जाते.

- भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकार(bhalwankarb@gmail.com) कॉफीत कॉफी किती आणि चिकोरी किती, याचे प्रमाण कॉफी उत्पादकांनी स्पष्ट केले पाहिजे, ही बातमी वाचली आणि गंमत वाटली. फिल्टर कॉफी आणि चिकोरीचे नाते अगदी जुने आहे. गेल्या दोनशे वर्षांपूर्वीपासून कॉफीत चिकोरी मिसळून विकली जाते. मी चिकोरी हे नाव ऐकले ते लहानपणी. आजी दुपारी चहा घेत नसे. दुधात कॉफी उकळून ती घेई.  स्वराज्यासाठी प्रत्येकाने  काही तरी त्याग केला पाहिजे, असं गांधीजींनी एका सभेत सांगितलं. त्या सभेला ती गेली होती. त्यानंतर तिने तिचा आवडता चहा सोडला. पुढची पन्नासेक वर्षं ती चहा प्यायली नाही, पुढे  पंचाहत्तरीनंतर पुन्हा चहा सुरू केला. त्यापूर्वी तिच्या कॉफीच्या  पाकिटावर चिकोरीयुक्त कॉफी असं लिहिलेलं असायचं... आज चाळिशीत असलेल्यांच्या आयुष्यात कॉफीचा प्रवेश झाला, तोच मुळी चिकोरीयुक्त कॉफीतून.

पुढे  स्टारबक्स, कॅफे कॉफी डेसारख्या ठिकाणी कॉफीचे अड्डे सुरू झाले, कॉफीच्या कपाचा आकार दुपटीने वाढला. काळ्याभोर कॉफीचा भलामोठा पेला हातात घेऊन ऑफिसला जाणारे लोक दिसू लागले तर कॉफीशॉप्समध्ये दुधाळ आणि आइसक्रिम घातलेली कॉफी पिणारी तरुणाई, एस्प्रेसोचा छोटा कप हातात घेऊन शांतपणे काम करणारे लोकही तिथेच कुठेतरी कोपऱ्यात बसू लागले. बहुतेक ब्रॅण्डेड कॉफीमध्ये चिकोरी मिश्रित कॉफी वापरत नाहीत. तरी चिकोरी मिसळलेल्या कॉफीची लोकप्रियता कमी झाली नाही.  कारण  चिकोरी आणि कॉफीच्या चवीत असलेले साम्य.

चिकोरी एक प्रकारचे मूळ असते. त्याला वाळवून, भाजून  त्याची पूड  कॉफीत मिसळली जाते. त्या दोन्ही चवी अगदी एकमेकांना पूरक असतात. कॉफी मुळात अतिशय कडवट असते, तिच्या कडू चवीला चिकोरी थोडे सौम्य करते. कॉफी रंगाने गडद असते, चिकोरी मात्र हलक्या चॉकलेटी रंगाची! दाक्षिणात्य फिल्टर कॉफीला चिकोरी अजून दुधाळ बनवते. चिकोरीमध्ये कॅफेन अजिबात नसते. म्हणजे कॉफीत चिकोरी मिसळली की तिच्यातले कॅफेनचे प्रमाण आपोआप कमी होते. कॉफीच्या काही चाहत्यांना हे नको असते. कॉफीतल्या कॅफेनमुळे शरीराला तरतरी येते, तिच्याशी तडजोड का करायची, असे त्यांना वाटते, म्हणून कॉफीत चिकोरी नाही ना, याची खात्री करून कॉफी पिणारे कमी नाहीत. असे असले तरी चिकोरीचे चिक्कार फायदे आहेत, ते पुढच्या भागात.

 

टॅग्स :foodअन्नJara hatkeजरा हटके