शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

FIFA Football World Cup 2018 : खिलाडूवृत्ती शिकावी डेन्मार्ककडून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 10:00 IST

पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने पेनल्टीसाठी केलेले नाटक व त्यावरील वाद नुकताच रंगला होता.

ठळक मुद्देखिलाडूवृत्ती जोपासत डेन्मार्कचा कप्तान मॉर्टन विगहर्स्ट याने गैरमार्गाने मिळालेल्या या संधीचा फायदा उठवला नाही.

सचिन खुटवळकर : पेनल्टी किक मिळाली की, गोल करण्याची आयती संधी प्राप्त होते. त्यासाठी खेळाडू अनेक उपद्व्याप करतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूचा जरासा धक्का लागला, तरी विव्हळण्याचे नाटक करतात. रेफ्रीने ते ग्राह्य धरले की पेनल्टी मिळते आणि बहुतेक वेळा पेनल्टीचे रुपांतर गोलमध्ये होते. रशियात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत व्हीएआर तंत्राचा वापर करून पेनल्टी निश्चित करण्याचा पर्याय उपलब्ध असला, तरी पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने पेनल्टीसाठी केलेले नाटक व त्यावरील वाद नुकताच रंगला होता. या पार्श्वभूमीवर पेनल्टीच्या बाबतीत २00३ साली डेन्मार्क-इराण संघांदरम्यानच्या सामन्याची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

या सामन्यादरम्यान मध्यंतर (हाफ टाइम) झाल्याची घोषणा करणारी शिट्टी वाजली. या वेळी चेंडू इराणच्या गोलपोस्टजवळ पेनल्टी एरियात होता. शिट्टीचा आवाज आल्यामुळे इराणच्या खेळाडूने हाताने बॉल उचलला. मात्र, त्यामुळे नियमभंग झाल्याचे सांगत रेफ्रीने डेन्मार्कला पेनल्टी किक बहाल केली. या प्रकारामुळे इराणी खेळाडू चिडले आणि त्यांनी रेफ्रीकडे दाद मागितली. मात्र, त्यांनी त्यांची बाजू ऐकून घेतली नाही. त्यानंतर डेन्मार्कचा कप्तान मॉर्टन विगहर्स्ट पेनल्टी किक मारण्यासाठी सज्ज झाला. इतक्यात डेन्मार्कचे प्रशिक्षक ओल्सन यांनी विगहर्स्टला बालावून घेत त्याला काही तरी सूचना केली. त्यानुसार, विगहर्स्टने बॉल गोलजाळीत न मारता, पायाने हळूच गोलपोस्टपासून लांब अंतरावर ढकलला. त्याच्या या कृतीमुळे मैदानात हजारोंच्या संख्येने उपस्थित फुटबॉलप्रेमींनी मोठा जल्लोष करत विगहर्स्टचे कौतुक केले.

...म्हणून विगहर्स्टने चेंडू मारला गोलपोस्टच्या बाहेरहाफ टाइम झाल्याची घोषणा करणारी शिट्टी वाजवली गेली होती ती एका आगाऊ प्रेक्षकाकडून. रेफ्रीने शिट्टी वाजविलीच नव्हती. त्यामुळे इराणी खेळाडूने बॉल हातात घेताच रेफ्रीने डेर्न्माकला पेनल्टी किक बहाल केली. खरे नाट्य यानंतर घडले. प्रेक्षकाचा आगाऊपणा लक्षात आल्यामुळे डेन्मार्कचे प्रशिक्षक ओल्सन यांनी पेनल्टी किक मारण्यासाठी सज्ज झालेला विगहर्स्ट याला तसे न करण्याची सूचना केली. यात इराणी खेळाडूची काहीच चूक नसल्याचे त्यांनी विगहर्स्टला पटवून दिले. त्यानंतर त्याने बॉल गोलजाळीत न मारता बाहेर लाथाडला.

विगहर्स्ट ठरला हिरो- सहसा पेनल्टी किकची संधी कोणी वाया घालवत नाही. मात्र, खिलाडूवृत्ती जोपासत डेन्मार्कचा कप्तान मॉर्टन विगहर्स्ट याने गैरमार्गाने मिळालेल्या या संधीचा फायदा उठवला नाही.- विगहर्स्टची ही कृती जगभर चर्चेचा आणि प्रशंसेचा विषय ठरली. या खिलाडूवृत्तीबद्दल त्याला २00३ सालचा ‘डॅनिश प्लेयर आॅफ द इयर’ हा किताब मिळाला. आॅलिम्पिक कमिटी फेअर प्ले अ‍ॅवॉर्डसाठीही त्याची निवड झाली.- यात नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे, हा सामना डेन्मार्कने १-0 असा गमविला. परंतु खिलाडूवृत्तीमुळे मॉर्टन विगहर्स्ट व डॅनिश संघाने जगभरातील फुटबॉल चाहत्यांची मने जिंकली

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलDenmarkडेन्मार्क