शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

औषधी आवळ्याच्या चविष्ट पाककृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 18:47 IST

आवळा हा फक्त औषधी नसतो त्यापासून चविष्ट पदार्थही तयार करता येतात.

ठळक मुद्दे* आवळ्याचा भात करता येतो.* आवळ्यापासून कढी आणि रस्समही होतं.* पोळीवर लावून खाण्यासाठी आवळाचा जॅम हा उत्तम पर्याय आहे.

 

सारिका पूरकर-गुजराथीआवळा फक्त सुपारी, मुरांबा, मोरआवळा , लोणचं किंवा च्यवनप्राश पुरतीच मर्यादित नाही. या बहुगुणी आवळ्याचा अनेक प्रकारे आहारात समावेश करता येतो. आवळ्यापासून भात, कढी, रस्सम, रायता असे अनेक चविष्ट पदार्थ करता येतात.1) आवळ्याचा भात :- मिक्सरच्या भांड्यात आवळ्याच्या फोडी, हिरव्या मिरच्या, हळद, मीठ घालून बारीक वाटून घ्या. भात मोकळा शिजवून गार करु न घ्या. मेथीदाणे भाजून पूड करु न घ्या. तेल तापवून हिंग, जिरे, कढीपत्ताची फोडणी करा. यातच हरभरा डाळ, उडीद डाळ घालून परता. नंतर शेंगदाणे घालून आणखी परतून घ्या. यात आता मेथीदाणे पूड, आवळ्याचं वाटण घालून परतून घ्या. गार केलेला भात आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा चांगले परतून एक वाफ काढा. सर्व्ह करण्याआधी त्यावर कोथिंबीर पेरावी.

 

2) आवळ्याचा जाम :- आवळे धुवून वाफवून घ्यावेत. फोडी करु न मिक्सरमधून वाटावेत. कढईत आवळ्याचं वाटण आणि साखर घालून मिश्रण चांगलं आटवून घ्यावं. 20 आवळ्यांसाठी 1 कप साखर हे प्रमाण असावं. मिश्रण आटलं की यात मध घालून ते बरणीत भरु न ठेवावं.

3) आवळ्याची कढी :- एक पारंपरिक परंतु अत्यंत चविष्ट असा हा प्रकार नक्की करून पाहा. आवळे धुवून चिरून घ्यावेत. मिक्सरच्या भांड्यात चिरलेले आवळे, खोवलेलं ओलं खोबरं, भाजलेले जिरे, भाजलेल्या लाल मिरच्या, चवीनुसार मीठ आणि दोन चमचे दही घालून मिश्रण बारीक वाटून घ्यावं. गरजेनुसार पाणी घालून कढीला चांगली उकळी काढावी.

4) आवळ्याचा रायता :- मिक्सरच्या भांड्यात आवळ्याचे तुकडे, ओले खोबरे, मीठ, हिरव्या मिरच्या वाटून घ्याव्यात. सायीचं दही फेटून त्यात हे वाटण घालावं. सोबत काकडीच्या फोडीही घालाव्यात. चवीला साखर घालावी. तेल गरम करु न जिरे-मोहरी-कढपत्त्याची फोडणी करु न रायत्यावर घालावी.

 

5) आवळा रस्सम :- जिरे, काळीमिरी, उडीदडाळ, धने कोरडेच भाजून घ्यावे. मिक्सरच्या भांड्यात हे मसाले, आवळ्याच्या फोडी, हिरव्या मिरच्या, आलं आणि पाणी घालूून वाटून घ्या. एका भांड्यात हे वाटण भरपूर पाणी आण हळद, मीठ घालून उकळून घ्या. साजूक तूपात जिरे, हिंग, कढीपत्त्याची फोडणी करु न ती रस्समवर घालावी. कोथिंबीर घालायला मात्र विसरु नका. यात हवी असल्यास शिजवलेली तुरडाळ, आलं-लसूण पेस्टही घालू शकता.