शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

औषधी गुणधर्म असलेला काळा तांदूळ माहितीये? भाव आहे ४०० रुपये किलो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 09:28 IST

काळ्या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात औषधीयुक्त गुणधर्म असतात. काळ्या तांदळाचा भात नियमित सेवन केल्यास शरीरातील अनेक आजार नाहीसे होण्यास मदत होते.

प्रवीण खिरटकर वरोरा (जि. चंद्रपूर) : काळ्या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात औषधीयुक्त गुणधर्म असतात. काळ्या तांदळाचा भात नियमित सेवन केल्यास शरीरातील अनेक आजार नाहीसे होण्यास मदत होते. वरोरा परिसरात काही शेतकऱ्यांनी काळ्या तांदळाची लागवड केली असून, या तांदळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. काळ्या तांदळाची लागवड करण्याचा विदर्भातील हा पहिलाच प्रयोग आहे.

यांनी केला प्रयोग यशस्वीवरोरा येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे निवृत्त अधिकारी श्रीहरी पोटे व निवृत्त मुख्याध्यापक वसंत बोर्डे यांची रामदेगी परिसरात शेती आहे. चंदनखेडा येथील सुधीर मुळेवार यांनी आपल्या शेतात काळा तांदूळ लावला होता. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर आसाम राज्यातून बियाणे चारशे रुपये प्रतिकिलो दराने बोलावले. मुळेवार यांनी दोन एकरामध्ये १६ क्विंटल उत्पादन घेतले, तर पोटे व बोर्डे यांनी एका एकरात २५ पोते उत्पादन घेतले. 

  • चीनच्या एका छोट्या भागात काळ्या तांदळाचे उत्पादन घेतले जाते. मोठ्या वाड्यात राहणारे लोक हा तांदूळ खायचे. 
  • पांढऱ्या तांदळापेक्षा हा तांदूळ आरोग्यदायी व फायदेशीर आहे. 
  • या भातात ॲन्टिऑक्सिडंटस् आढळतात. ते शरीरातील दूषित घटक स्वच्छ करण्याशिवाय अनेक रोगांमध्ये फायदेशीर ठरतात. 
  • हृदयाशी संबंधित असलेल्या अनेक रोगांपासून या तांदळाचे सेवन दूर ठेवते. 

सध्या बाजारात काळ्या तांदळाला ३५० ते ४०० रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. पुढील वर्षी अधिक लागवड केली जाईल. सध्या शेतकरी या तांदळाची विक्री घरूनच करीत आहेत. बाजारपेठ उपलब्ध झाल्यास उत्पादन वाढेल, असे मानले जात आहे.

काळ्या तांदळात औषधी गुणधर्म असल्यामुळे आरोग्याकरिता उपयुक्त आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर शेतकऱ्यांनी उत्पादन घेण्यास हरकत नाही.विजय काळे, मंडळ कृषी अधिकारी, वरोरा

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रchinaचीन