शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करणे आणि शरीरात रक्त वाढवण्यासाठी फायदेशीर आहे हा नाश्ता, जाणून घ्या रेसिपी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 16:55 IST

Beetroot Idli Recipe: नेहमीच इडली खाऊन कंटाळा आला असेल तर ही हेल्दी आणि आरोग्याला फायदेशीर वेगळी इडली नक्कीच तुम्हाला आवडले. 

Beetroot Idli Recipe: सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. सकाळच्या नाश्त्यामुळे दिवसभर काम करण्याची एनर्जी मिळते. अशात नाश्ता हा पौष्टिक आणि पोटभर केला पाहिजे. तुम्ही जर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल आणि तुम्हाला हेल्दी नाश्ता करायचा असेल तर तुम्ही बिटाची इडली ट्राय करू शकता. नेहमीच इडली खाऊन कंटाळा आला असेल तर ही हेल्दी आणि आरोग्याला फायदेशीर वेगळी इडली नक्कीच तुम्हाला आवडले. 

बिटामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. तसेच यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सही असतात. इतकंच नाही तर यात व्हिटॅमिन सी आणि आयर्नही भरपूर असतं. ज्यामुळे शरीरात लाल रक्तपेशी वाढण्यास मदत मिळते. तसेच याने शरीराचा वेगवेगळ्या इन्फेक्शनपासूनही बचाव होतो. इतकंच नाही तर बीट हे एक नॅचरल प्यूरिफायर सारखंही काम करतं. याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. अशात चला जाणून घेऊ कशी बनवाल बिटाची इडली.

बिटाची इडली बनवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही बीट हिरव्या मिरच्या आणि आल्यासोबत बारीक करून घ्या. याची मुलायम पेस्ट तयार व्हायला हवी. नंतर एका वाट्यामध्ये बिटाची पेस्ट, सोजी, दही आणि मीठ टाका. हे चांगलं मिक्स करून घ्या आणि घट्ट बॅटर तयार करा. काही वेळासाठी ते तसंच राहू द्या.

आता तुम्हाला एक तडका तयार करायचा आहे. एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात राई, उडीद डाळ, कापलेला कांदा आणि कढीपत्ते टाका. हा तयार तडका बॅटरमध्ये टाका. थोडं फ्रूट सॉल्ट टाका आणि चांगलं मिक्स करा. इडलीच्या भांड्यात बॅटर टाका आणि १० मिनिटे स्टिम करा. बिटाची इडली तयार आहे. ही तुम्ही सांबार आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स