शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

अमृतसरी कुलचा! कोयी कशाला मोजता राव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 12:13 IST

भिजवून थोड्या आंबवलेल्या मैद्यात, कांदा, धणे, जिरे उकडलेला बटाटा आणि काही मसाले भरून ते तंदूरमध्ये खरपूस भाजले जातात. वरून मग शुद्ध लोणी किंवा बटर लेप लावून, मसाला/आचारी प्याज, लोणचे, लिंबू या त्रयीसोबत दिले जातात.

- शुभा प्रभू साटम, खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक shubhaprabhusatam@gmail.com

सुवर्ण मंदिरात मत्था टेकून आशीर्वाद घेऊन भाविक सुखी, संतुष्ट होतात आणि मग भक्कम कुलचा रिचवून तृप्त. अमृतसरच्या या कुलच्याने आपल्या गावच्या सीमा कधीच पार करून जगभर ठसा उमटवला आहे. कुलचा पाहिल्यावर तुम्ही म्हणाल, हा तर आलू परोठा!! तर पूर्ण चूक. मराठी घरात जशी चपाती/घडीची पोळी/फुलका वेगवेगळे असतात तसाच हा पदार्थही. 

भिजवून थोड्या आंबवलेल्या मैद्यात, कांदा, धणे, जिरे उकडलेला बटाटा आणि काही मसाले भरून ते तंदूरमध्ये खरपूस भाजले जातात. वरून मग शुद्ध लोणी किंवा बटर लेप लावून, मसाला/आचारी प्याज, लोणचे, लिंबू या त्रयीसोबत दिले जातात.आता ठेल्यावर तंदूर कसा? दोस्तों , ये इंडिया है!! हॉटेलची जागा असेल तर भट्टी अथवा शेगडीवर चक्क भक्कम कुकर उलटा ठेवून त्यावर कुलचे शेकवतात. प्रत्येक जागेवरील कूलचाची चव आगळी आणि सोबत दिले जाणारे जोडीदार पण. कुठे कांदा-टोमॅटो, कुठे लोणचे, तर कुठे पुदिना चटणी.

एक मोठा कुलचा खाऊन पोट तट्ट व्हायलाच हवे. पंजाब, दिल्ली इथे असणाऱ्या कुलचा गाड्या अमाप आहेत. वास्तविक मोठ्या हॉटेल्समध्येही कुलचे मिळतात, पण खरी मजा रस्त्यावर खाण्यात आहे आणि एक, या लुसलुशीत कुलच्यासोबत सॉस/केचप नसतो आणि दिला जात असला तरी मी अज्ञानात सुख मानेन!! आता असा अमृतसरी कुलचा कसा आला? तर उत्तर हे की, तुम्हाला आंबे खायचेत की कोयी मोजायच्यात? इतिहास काहीही असो, या कुलच्याला तोड नाही. शिष्ट, अखडू ब्रिटिश, अगडबंब पदार्थ आवडणारे अमेरिकन, अगदी कॅनडा, फ्रान्स या देशात पण कुलचाचा उल्लेख मोस्ट प्रीफर्ड इंडियन ब्रेड म्हणून होतो. आणि याची लज्जत बाहेर खाण्यात आहे. का ते मला माहीत नाही. 

उगाच साध्या गोष्टी चिवडत बसू नका राव. पत्रावळीवर (अस्सल कुलचा यावरच) वाफळणारा, छान दरवळणारा कुलचा, बाजूला असणारे कांदा, लोणचे, चटणी या भक्कम जोडीदारासमवेत येणारा कुलचा नजरेने बघून त्याचा दरवळ घेत घेत खायला सुरुवात करा आणि खाऊन झाले की लस्सी प्यावी, की लिंबू सोडा की कडक चहा हे चवदार कोडे सोडवायच्या मार्गाला लागा..