शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

कारल्याच्या भाजीत 'हे' घाला, कडवटपणा होईल गायब...लागेल आणखी चविष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 18:11 IST

कारले चवीला अतिशय कडवट पण आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असते. कडवटपणामुळे घरात कोणालाच कारल्याची भाजी खायला आवडत नाही. अशा वेळी काय कराल? वाच्या साध्या सोप्या टीप्स...

कारले चवीला अतिशय कडवट पण आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असते. कडवटपणामुळे घरात कोणालाच कारल्याची भाजी खायला आवडत नाही. वास्तविक या भाजीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, बीटा कॅरेटीन, लोह, झिंक, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फ्लेव्होनॉईड असे अनेक गुणकारी घटक असतात. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या सर्व घटकांशी शरीराला गरज असते.

का खावी कारल्याची भाजी?आजारपणापासून दूर राहू शकता. सध्या कोरोनाच्या काळात प्रतिकार शक्ती मजबूत करण्याची गरज आहे. शिवाय ज्यांना मधुमेह अथवा सांधेदुखी आहे अशा लोकांसाठीही कारले फायदेशीर ठरते. शिवाय या भाजीमुळे तुमची पचनशक्ती सुधारते. कारल्याचा रस पिण्यामुळे आरोग्यावर चांगले परिणाम होतात. पण जर तुम्हाला कारले कडू लागते म्हणून आवडत नसेल तर काही टिप्स फॉलो करून तुम्ही कारल्याचा कडूपणा कमी करू शकता. यासाठी जाणून घ्या कारल्याचा कडूपणा कसा कमी करावा.

कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी सोप्या टिप्स:

  • सर्वात महत्त्वाची आणि पारंपारिक टिप म्हणजे कारली चिरून घेताना त्यात मीठ घालून ती पिळून घेणे. यामुळे कारल्यातील सर्व कडूपणा कमी होतो.
  • कारले स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्यावरील काटेरी भाग चाकूने काढून टाका. यामुळे तुम्ही केलेली कारल्याची भाजी कमी कडू लागेल
  • कारल्याची भाजी केल्यावर ती परतून गॅस बंद करण्यापूर्वी त्या भाजीत थोडा गुळ टाका. गुळाचा गोडवा कारल्याचा कडूपणा कमी करेल.
  • कारल्याचा कडूपणा हा त्याच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात असतो. यासाठी भाजी करताना अथवा कारल्याचा ज्युस करताना कारलं सोलून त्यामधील बिया काढून टाका.
  • कारल्याची भाजी करताना ती तव्यावर चांगली परतून घ्या. या पद्धतीने भाजी कोरडी होईल त्यामधील रस सुकून गेल्यामुळे आणि कारली चांगली परतली गेल्यामुळे त्याचा कडूपणा कमी होईल.
  • कारल्याची भाजी करताना कारली स्वच्छ धुवून, चिरून दह्यात मॅरिनेट करा. ज्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो. मात्र काही जण कारल्यासोबत दही खाऊ नये असा सल्ला देतात. त्यामुळे या गोष्टींचा नीट विचार करून कारलं दह्यासह खा.
  • भाजीसाठी कारल्याच्या फोडी चिरून आणि पिळून घेण्यापूर्वी त्यात मीठासोबत थोडी साखर आणि व्हिनेगर वापरा. ज्यामुळे भाजी कडू होणार नाही.
  • कारली गरम पाण्यात उकडल्यामुळे कारल्याचा कडूपणा काही प्रमाणात नक्कीच कमी होतो.
  • कारले सोलून त्याला कणीक आणि मीठ लावून ठेवावे आणि मग ते धुवून घ्यावे
  • कारले उभे चिरून तांदळाच्या पाण्यात भिजत ठेवल्यास कारल्याचा कडूपणा कमी होतो.
  • कारले मसाले टाकून परतावे आणि त्यात शेंगदाण्याचा कुट टाकावा ज्यामुळे कारल्याची भाजी कडू होत नाही.
  • कारले कमी कडू लागावे यासाठी कारल्याच्या भाजीत आमचूर पावडर टाका.
टॅग्स :foodअन्नHealthआरोग्यReceipeपाककृतीRecipeपाककृती