शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

जांभूळ खाल्ल्यानं होतात 17 फायदे. मधुमेह, हदयविकार, पोटाचे विकार आणि त्वचाविकारावर जांभूळ आहे गुणकारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2017 18:31 IST

जांभळाचे 17 आरोग्यदायी फायदे आहेत. जांभूळ खाल्ल्यानंही आपण फीट राहू शकतो.

- मृण्मयी पगारेमे, जूनचा काळ म्हणजे बाजारात जांभळं मिळतातंच. जांभूळ म्हणजे जंगली फळ. पण या फळाकडे फक्त सिझनल फळ म्हणून पाहू नका. दोन अडीच महिन्यात भरपूर जांभळं खाऊन घ्या. आणि पुढे वर्षभर जांभळाच्या बिया, झाडाची साल, पानं, ज्युसेसचा आणि सिरपचा उपयोग करा. कारण जांभळाचे  17 आरोग्यदायी फायदे आहेत. जांभूळ खाल्ल्यानंही आपण फीट राहू शकतो. जांभूळ खाऊन फीट होण्याची संधी मग दवडायची कशाला?

 

        जांभूळाचे आरोग्यदायी उपयोग1) जांभळाचा मोठा फायदा हा मधुमेहाच्या आजारात होतो. जांभळामध्ये असलेल्या मधुमेहविरोधी गुणधर्मामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहाते. जांभळामुळे रक्तातील स्टार्च आणि साखरेचं रूपांतर ऊर्जेमध्ये होतं. 2. जांभळाचा उपयोग मधुमेहातील प्राथमिक लक्षणांवर होतो. उदा. अति तहान लागणं, वारंवार लघवीला होणं यासारखी लक्षण जांभूळ खाल्ल्यानं बरी होतात. जांभूळाच्या फळासोबतच जांंभळाच्या बियांची पावडर, जांभळाच्या झाडाची साल, जांभळाचा रस याचाही मधुमेहावर उपचार करताना चांगला उपयोग होतो. 3. जांभळाच्या झाडाच्या सालाची आणि बियांची पावडर पोटाच्या विकारावर गुणकारी असते. डायरिया, अपचन, जुलाब यासारख्या आजारात त्यांचा उपयोग फायदेशीर असतो.

 

               4. जांभूळ हे नैसर्गिकरित्या रक्त शुध्द करतं. जांभळामध्ये मोठ्याप्रमाणावर लोह म्हणजेच आर्यन असतं. त्यामुळे जांभूळ खाल्ल्यानंही रक्तातील हिमोग्लोबीन वाढतं.5) जांभूळात मोठ्या प्रमाणात अ आणि क जीवनसत्त्वं असतं. तसेच खनिजंही असतात त्याचा उपयोग डोळ्यांचं आणि त्वचेचं आरोग्य सुदृढ ठेवण्यास होतो. 6) जांभूळ हे गुणानं थंड फळ असल्यानं पोटातील आग आणि अपचन यावर उपयोगी असतं. 7) जांभूळात अ‍ॅस्ट्रीजेण्ट असल्यानं जांभूळ खाल्ल्यानं त्वचा चांगली राहते. विशेषत: तेलकट त्वचेकरता जांभूळ खूपच फायदेशीर असतं. जांभूळामुळे त्वचा ही मऊ आणि डागरहित राहते. शिवाय त्वचेच्या दाहही जांभूळ खाल्ल्यानं कमी होतो. 8) जांभूळामध्ये आॅक्सेलिक अ‍ॅसिड, मॅलिक अ‍ॅसिड, बेट्यूलिक अ‍ॅसिड यासारखे घटक असल्यानं जांभूळ हे फळ उत्तम प्रतिजैविक म्हणूनही काम करतं. 9) जांभूळ खाल्ल्यानं दात आणि हिरड्या मजबूत होतात. आणि दात आणि हिरड्यात संसर्ग होत नाही. 10) जांभूळात मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्वं असतं. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. आणि ॠतुबदलाच्या आजारावर जांभूळ फळाचं सेवन फायदेशीर ठरतं. 11) जांभूळामध्ये मोठ्या प्रमाणात अ‍ॅण्टिआॅक्सिडंट असतं. त्यामुळे जांभूळ फळाच्या सेवनाचा उपयोग त्वचा तरूण ठेवण्यासाठीही होतो. जांभूळामुळे त्वचेवर वाढत्या वयाच्या खुणा दिसत नाहीत. 12) जांभळाच्या बियांची पावडर गायीच्या दूधात मिक्स करून हा लेप चेहेऱ्याला लावल्यास चेहेऱ्यावरच्या मुरूम, पुटकुळ्या निघून जातात. 13) मूतखडयांवर उपचार म्हणून जांभळाच्या बियांची पावडर योगर्टसोबत घ्यावी. 14) जांभळाचं व्हिनेगर/ सिरप दिवसातून दोन ते तीन वेळेस पाण्यासोबत समप्रमाणात घेतल्यास भूक वाढते.

 

                     15) जांभळाचं ज्यूस पाण्यात घालून ते पाणी त्वचाविकारात त्वचेला लावल्यास फायदेशीर ठरतं. 16) जांभळाच्या ज्यूसचा उपयोग अशक्तपणा, अ‍ॅनेमिया, यावरही होतो. तसेच जांभळाच्या ज्यूसच्या नियमित सेवनानं स्मरणशक्ती वाढते. 17) जांभूळामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असल्यानं जांभूळ खाल्ल्यानं हदयविकारापासून दहा हात दूर राहाता येतं. जांभूळ खाल्ल्यानं हदय सशक्त होतं आणि हायपरटेन्शन होत नाही.