त्या महिलेने शाहरुख खानच्या श्रीमुखात भडकवली

By Admin | Updated: March 1, 2016 18:31 IST2016-03-01T18:31:55+5:302016-03-01T18:31:55+5:30

बॉलिवूड बादशहा शाहरुख खानच्या एका महिलेने चक्क कानाखाली लगावली होती,स्वत: शाहरुख खानने हे सांगितलं आहे

The woman barked at the head of the Shahrukh Khan | त्या महिलेने शाहरुख खानच्या श्रीमुखात भडकवली

त्या महिलेने शाहरुख खानच्या श्रीमुखात भडकवली

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. १ - बॉलिवूड बादशहा शाहरुख खानच्या एका महिलेने चक्क कानाखाली लगावली होती. ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र स्वत: शाहरुख खानने हे सांगितलं आहे. शाहरुख खानने नुकताच त्याच्या आगामी चित्रपट 'फॅन'चा ट्रेलर लाँच केला. यावेळी बोलताना त्याने हा किस्सा सांगितला. 
 
शाहरुख खानला तुम्ही कधी मुंबईत ट्रेनने प्रवास केला आहे का ? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी शाहरुखने आपण पहिल्यांदा ट्रेनने प्रवास केल्याची आठवण शेअर केली. शाहरुख खानने सांगितल 'मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आलो तेव्हा ट्रेनने आलो होतो. तेव्हा एक गमतीदार गोष्ट घडली जी मी अद्यापपर्यंत कोणालाच सांगितलेली नाही. मी पहिल्यांदाच ट्रेनने प्रवास करत होतो, ती कदाचित इंटरसिटी एक्र्सप्रेस होती. महाराष्ट्रात ट्रेन पोहोचल्यानंतर ती लोकल होते याची मला कल्पना नव्हती त्यामुळे मी आणि माझे मित्र ट्रेन महाराष्ट्रात पोहोचल्यानंतरही बर्थवर झोपून, बसून मजा मस्ती करत होतो. कोणीही या सीटवर बसू शकत याची कल्पना आम्हाला नव्हती. एक माणूस बसायला आल्यावर ही सीट आमची आहे म्हणत आम्ही त्याला हाकलून लावलं. त्यानंतर एक महिला तिथे आली, तिच्यासोबत एक पुरुषदेखील होता. आम्ही त्या महिलेला सांगितलं तुम्हाला बसायची परवानगी आम्ही देऊ मात्र यांना देणार नाही, यावर त्या महिलेने माझ्या जोरदार कानाखाली लगावली आणि सांगितलं सीट सगळ्यांसाठी आहेत'.
 

Web Title: The woman barked at the head of the Shahrukh Khan