बायको लग्नाची आहे पण कायद्याची नाही, दीपक तिजोरीला धक्का

By Admin | Updated: March 31, 2017 17:02 IST2017-03-31T16:55:13+5:302017-03-31T17:02:28+5:30

पत्नी घरात घेत नसल्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी दिपक वकिलाकडे गेल्यावर त्याच्यासमोर धक्कादायक गोष्ट आली आहे.

The wife is married but not the law, the lamp shakes the safe | बायको लग्नाची आहे पण कायद्याची नाही, दीपक तिजोरीला धक्का

बायको लग्नाची आहे पण कायद्याची नाही, दीपक तिजोरीला धक्का

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - अभिनेता आणि दिग्दर्शक दीपक तिजोरीला पत्नीने घराबाहेर काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्पॉटबॉय या संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, दीपकचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याने त्याला घराच्या बाहेर काढण्यात आले आहे. तो गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मित्रांसोबत अथवा पेइंग गेस्ट म्हणून राहात आहे. 
अभिनेता दीपक तिजोरीला त्याच्या खासगी आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. दीपक आपल्या पत्नीसोबत गोरेगावला 4 बीएचकेच्या घरात राहत होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्या दोघांच्या नात्यात मतभेदांमुळे तणावाचे वातावरण होते. पत्नी घरात घेत नसल्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी दिपक वकिलाकडे गेल्यावर त्याच्यासमोर धक्कादायक गोष्ट आली आहे.
कायद्याने त्याचे आणि शिवानीचे लग्नच झालेले नाही. दीपकसोबत लग्न करण्याआधी शिवानीचे लग्न झालेले होते आणि तिने तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट न देताच दीपकसोबत लग्न केले होते. त्यामुळे हे लग्न कायद्याने वैध ठरत नाही असे वकिलाचे म्हणणे आहे. या दोघांना 21 वर्षांची मुलगी देखील आहे. 
शिवानी ही एक फॅशन डिझायनर असून तिने पोटगीसाठी मागणी केली आहे. तिचा आणि त्यांच्या मुलीचा खर्च ती भागवू शकत नाही असे तिचे म्हणणे आहे. वांद्रेतील कोर्टात सध्या ही केस सुरू आहे. याविषयी दिपकने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 
नवव्दीच्या दशकात दिपक तिजोरीने सडक, खिलाडी, जो जिता वही सिकंदर यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो अभिनयानंतर दिग्दर्शन आणि निर्मितीकडे वळला. त्याने फरेब, टॉम डिक अँड हॅरी या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तसेच तो बिग बॉसमध्ये देखील झळकला होता. 
 

Web Title: The wife is married but not the law, the lamp shakes the safe