'कॅमेऱ्यासमोर naked...', संजीदा शेखचं बोल्ड सीन्सवर भाष्य; म्हणाली, "मी निर्लज्ज होते..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 17:04 IST2024-08-08T17:03:40+5:302024-08-08T17:04:23+5:30

'हीरामंडी' मुळे संजीदा शेख चर्चेत आली आहे.

Sanjeeda Shaikh talks about Bold scenes in front of camera shares her views | 'कॅमेऱ्यासमोर naked...', संजीदा शेखचं बोल्ड सीन्सवर भाष्य; म्हणाली, "मी निर्लज्ज होते..."

'कॅमेऱ्यासमोर naked...', संजीदा शेखचं बोल्ड सीन्सवर भाष्य; म्हणाली, "मी निर्लज्ज होते..."

'हीरामंडी' फेम अभिनेत्री संजीदा शेख (Sanjeeda Shaikh) हिचा अभिनय प्रवास हा टीव्ही ते बॉलिवूड असा राहिला आहे. 'बागबान' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. याआधी तिने काही हिंदी मालिकांमधून आपल्या अभिनयाची जादू दाखवली. संजीदा सौंदर्यातही भल्याभल्यांना मात देते. नुकतंच 'हीरामंडी'निमित्त झालेल्या मुलाखतीत तिने बोल्ड सीनबाबत वक्तव्य केलं.

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत संजीदा म्हणाली, "मी अभिनेत्री म्हणून अगदी निर्लज्ज बनून जाते. मी कॅमेऱ्यासमोर नेकेड आहे आणि माझ्याजवळ कोणतंही व्हिजन नसतं. सुरुवातीला मी किसींग सीन देणार नाही, बोल्ड सीन करणार नाही असं व्हायचं. पण मला हे कधीच सांगावं लागलं नाही कारण सगळ्यांना माहित होतं की हा ही तर करणार नाही. मी काही असं कॉन्ट्रॅक्ट केलं नव्हतं. हे आपसी सहमतीने व्हायचं. जेव्हा कधी आम्ही एखाद्या टीव्ही मालिकेत काम करायचो तेव्हा आरामात ३ ते ४ वर्ष लागायची. त्यामुळे संपूर्ण टीम एकमेकांना चांगलं ओळखून असायची. तिथे मैत्रीपूर्ण नातं तयार व्हायचं. त्यामुळे मी हे करणार नाही हे सांगतानाही काहीच वाटायचं नाही."

ती पुढे म्हणाली, "पण आज मी प्रामाणिक राहू इच्छिते. मला वाटतं जे ाकम मी करत आहे त्यात मी प्रामाणिक राहीन. मी कॅमेऱ्यासमोर आपल्या भूमिकेसाठी मला हे करायचं आहे. तसंच  ज्याचं त्याच्या कामावर प्रेम आहे त्याच्यासोबत मला प्रामाणिक राहायचं आहे."

संजीदा शेखने हृतिक आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर' सिनेमातही काम केले. याशिवाय संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' तील तिच्या कामाचंही कौतुक झालं.

Web Title: Sanjeeda Shaikh talks about Bold scenes in front of camera shares her views