श्रीकांत तिवारी परत येतोय! मनोज वाजपेयींनी 'द फॅमिली मॅन ४'वर दिली अपडेट; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 11:07 IST2026-04-27T11:07:29+5:302026-04-27T11:07:59+5:30

अभिनेते मनोज वाजपेयींची गाजलेली वेब सीरिज 'द फॅमिली मॅन'च्या चौथ्या सीझनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

manoj bajpayee gave update on the family man series fourth season says coming soon | श्रीकांत तिवारी परत येतोय! मनोज वाजपेयींनी 'द फॅमिली मॅन ४'वर दिली अपडेट; म्हणाले...

श्रीकांत तिवारी परत येतोय! मनोज वाजपेयींनी 'द फॅमिली मॅन ४'वर दिली अपडेट; म्हणाले...

अभिनेते मनोज वाजपेयींची गाजलेली वेब सीरिज 'द फॅमिली मॅन'च्या चौथ्या सीझनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या सीरिजच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते आणि आता खुद्द मनोज यांनीच संकेत दिले आहेत. पुढचा सीझन आधीपेक्षाही अधिक दमदार आणि थरारक असणार आहे.

मनोज वाजपेयींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका चाहत्याने तिसऱ्या सीझनच्या शेवटच्या भागातील सस्पेन्सबाबत प्रश्न विचारला असता, मनोजने उत्तर दिले की, 'तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे चौथ्या सीझनमध्ये मिळतील, लवकरच भेटूया.' इतकेच नाही तर त्यांनी मिश्किल अंदाजात 'आता सर्व काही चौथ्या सीझनमध्ये... मार-काट खल्लास!' असे म्हणत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

'द फॅमिली मॅन'चा तिसरा सीझन नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये ईशान्य भारताच्या पार्श्वभूमीवर कथा दाखवण्यात आली होती. देशाच्या सुरक्षेचा मोठा धोका आणि श्रीकांत तिवारीची कौटुंबिक ओढाताण याचे उत्तम सादरीकरण यात करण्यात आले होते. या सीझनमध्ये जयदीप अहलावत आणि निमरत कौर यांच्या एन्ट्रीने कथेला एक वेगळेच वळण दिले होते, ज्यामुळे आता चौथ्या सीझनची प्रतीक्षा वाढली आहे. सीझनच्या शेवटी श्रीकांत तिवारी गंभीर जखमी होतो. तो जिवंत राहतो का की नाही या संभ्रमात प्रेक्षकांना टाकण्यात आलं. तसंच जयदीप अहलावतही जखमी अवस्थेत दाखवण्यात आला आहे. याशिवाय बंदुकीतील झाडलेली एक गोळी निम्रत कौरला लागते की आणखी कोणाला असे प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.

चौथा सीझन कधी रिलीज होणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मनोज वाजपेयींनी स्पष्ट केले आहे की, चाहत्यांच्या अपेक्षा खूप जास्त असल्याने या प्रोजेक्टमध्ये घाई केली जाणार नाही. स्क्रिप्ट, शूटिंग आणि पोस्ट-प्रोडक्शनसाठी बराच वेळ लागतो, त्यामुळे चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी किमान एक ते दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. मात्र, श्रीकांत तिवारी पुन्हा एकदा नव्या मिशनवर परतणार हे आता निश्चित झाले आहे.

Web Title : श्रीकांत तिवारी की वापसी! मनोज बाजपेयी ने 'द फैमिली मैन 4' पर दिया अपडेट

Web Summary : मनोज बाजपेयी ने 'द फैमिली मैन' सीजन 4 की पुष्टि की! पिछले सीज़न के अनसुलझे सवालों के जवाबों के साथ और रोमांचक सीजन की उम्मीद है। रिलीज में एक से दो साल लग सकते हैं।

Web Title : Srikant Tiwari Returns! Manoj Bajpayee Updates on 'The Family Man 4'

Web Summary : Manoj Bajpayee confirms 'The Family Man' Season 4 is coming! Expect a more thrilling season answering unresolved questions from the previous installment. Release may take one to two years.