Gullak 5: सर्वांच्या आवडत्या 'गुल्लक' वेबसीरिजच्या पाचव्या सीझनचा टीझर रिलीज, पण 'अन्नू भय्या' बदलल्याने प्रेक्षक नाराज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 14:38 IST2026-05-08T14:35:12+5:302026-05-08T14:38:36+5:30

'अन्नू मिश्रा' ही गाजलेली भूमिका साकारणाऱ्या वैभवने ही वेबसीरिज सोडली असून त्याच्या जागी आता एका नवीन अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे

Gullak 5 Teaser actor anant joshi replaced actor vaibhav gupta as annu mishra | Gullak 5: सर्वांच्या आवडत्या 'गुल्लक' वेबसीरिजच्या पाचव्या सीझनचा टीझर रिलीज, पण 'अन्नू भय्या' बदलल्याने प्रेक्षक नाराज?

Gullak 5: सर्वांच्या आवडत्या 'गुल्लक' वेबसीरिजच्या पाचव्या सीझनचा टीझर रिलीज, पण 'अन्नू भय्या' बदलल्याने प्रेक्षक नाराज?

ओटीटीवरील अत्यंत लोकप्रिय कौटुंबिक कॉमेडी वेबसीरिज 'गुल्लक'च्या चाहत्यांसाठी तशी आनंदाची पण काहीशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. या वेबसीरिजच्या ५ व्या सीझनमध्ये प्रेक्षकांचा लाडका अभिनेता वैभव राज गुप्ता दिसणार नाहीये. 'अन्नू मिश्रा' ही गाजलेली भूमिका साकारणाऱ्या वैभवने ही वेबसीरिज सोडली असून त्याच्या जागी आता एका नवीन अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.

वैभव राज गुप्ताने का सोडली मालिका?

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव राज गुप्ता आणि या सीरिजचे निर्माते (TVF) यांच्यात काही गंभीर मतभेद झाले होते. हे वाद इतके टोकाला गेले की वैभवला या सुपरहिट वेबसीरिजमधून बाहेर पडावे लागले. वैभव पाचव्या सीझनमध्ये दिसणार नसल्याने चाहते निराश झाले आहेत, कारण त्याने साकारलेला 'अन्नू भैय्या' घराघरात लोकप्रिय झाला होता.

कोण आहे नवा 'अन्नू मिश्रा'?

वैभव राज गुप्ताची जागा आता अभिनेता अनंत विजय जोशी घेणार आहे. अनंतने यापूर्वी अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्याने नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यावर आधारित 'अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी' या बायोपिकमध्ये योगी आदित्यनाथ यांची भूमिका साकारली होती. याशिवाय त्याने '१२th फेल', 'मामला लीगल है', 'कटहल' आणि 'ये काली काली आँखें' यांसारख्या प्रसिद्ध सिनेमा आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे.


चाहत्यांमध्ये उत्सुकता पण...

'गुल्लक' ही वेबसीरिज एका मध्यमवर्गीय 'मिश्रा' कुटुंबाच्या साध्या पण मनाला भिडणाऱ्या गोष्टींसाठी ओळखली जाते. संतोष मिश्रा, शांती मिश्रा आणि त्यांची दोन मुले अन्नू आणि अमन यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. आता वैभवच्या जाण्यानंतर, अनंत विजय जोशी या भूमिकेला किती न्याय देतो आणि छोटा भाऊ अमनसोबत त्याची केमिस्ट्री कशी जमते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मालिकेचा पाचवा सीझन

श्रेयांश पांडे निर्मित आणि टीव्हीएफ (TVF) द्वारे प्रस्तुत 'गुल्लक'चे आतापर्यंत चार यशस्वी सीझन आले आहेत. पहिल्या सीझनला आयएमडीबी (IMDb) वर ९ रेटिंग मिळाले होते, तर इतर सीझन्सनाही ८ पेक्षा जास्त रेटिंग मिळाले आहे. या मोठ्या बदलानंतर पाचवा सीझन आपली लोकप्रियता टिकवून ठेवणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ही वेबसीरिज सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Web Title : गुल्लक 5: टीज़र जारी, नया 'अन्नू भैया', क्या फैंस हुए निराश?

Web Summary : लोकप्रिय वेब सीरीज 'गुल्लक' सीजन 5 के साथ वापसी कर रही है, लेकिन वैभव राज गुप्ता की जगह एक नए अभिनेता अन्नू के रूप में आ रहे हैं। इस बदलाव से कई प्रशंसक निराश हैं, जिन्हें गुप्ता का किरदार बहुत पसंद था। अब अनंत विजय जोशी अन्नू मिश्रा की भूमिका निभाएंगे।

Web Title : Gullak Season 5: Teaser Released, New 'Annu Bhaiya', Fans Disappointed?

Web Summary : The popular 'Gullak' web series returns for season 5, but with a new actor replacing Vaibhav Raj Gupta as Annu. This change has disappointed many fans who loved Gupta's portrayal of the character. Anant Vijay Joshi will now play Annu Mishra.