Next

Ti Parat Aaliye Serial Horror scene Making Off | असा शूट झाला ‘ती परत आलीये’चा थरारक सिन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 12:33 PM2021-09-27T12:33:56+5:302021-09-27T12:34:13+5:30

झी मराठी वाहिनीवरील ‘ती परत आलीये’ या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलय. झी मराठीवरील ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे आणि सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी या मालिकेला आणि या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेला पसंती दर्शवली. मालिकेतील थरारक सिन्सने प्रत्येकालाचं धडकी भरतेय. मात्र या मालिकेतील हे थरकाप उडवणारे सीन कसे शूट होतात हे तुम्हाला माहितेय का? मालिकेतील सर्व सीन कसे शूट केले जात असतील असा प्रश्न सर्वांच्याच मनात येत असेल. याबाबतचा एक व्हिडीओ झी मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.