‘Devmanus 2 ’चा टीआरपी घसरताच निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 11:42 IST2022-02-13T11:41:53+5:302022-02-13T11:42:19+5:30

Devmanus 2  : ‘देवमाणूस 2’ ही मालिका सुरू होऊन काही महिने झाले आहेत. पहिल्या सीननप्रमाणेच मालिकेच्या या दुसऱ्या सीझनलाही सुरूवातीला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पण...

zee marathi serial Devmanus 2 Some major Twists To Expect Ahead In The Story | ‘Devmanus 2 ’चा टीआरपी घसरताच निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या काय?

‘Devmanus 2 ’चा टीआरपी घसरताच निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या काय?

Devmanus 2  : ‘देवमाणूस’ (Devmanus) या मालिकेने टीव्हीवर नुसता धुमाकूळ घातला होता. ही मालिका तुफान गाजली होती. मालिकेची प्रचंड लोकप्रियता पाहूनच, या  मालिकेचा दुसरा सीझन आणण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. त्यानुसार,‘देवमाणूस 2’ (Devmanus 2 ) प्रेक्षकांच्या भेटीस आली. पहिल्या सीननप्रमाणेच मालिकेच्या या दुसऱ्या सीझनलाही सुरूवातीला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पण गेल्या काही दिवसांत मालिकेचा टीआरपी घसरू लागल्याचे कळतंय. आता अशात प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी काही तर करायलाचं हवं. त्यानुसार, ‘देवमाणूस 2’च्या मेकर्सनी एक मोठा निर्णय घेतल्याचे समजतंय.

होय, मालिका अधिक रंजक व्हावी यासाठी येत्या काही दिवसांत मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहेत. काही दिवसांआधीच ‘देवमाणूस 2’च्या जागी ‘अबोली’ही नवा मालिका सुरू झाली. साहजिकच, ‘देवमाणूस 2’च्या टीआरपीवर त्याचा परिणाम झाला. ‘देवमाणूस 2’ला हवा तो प्रतिसाद मिळत नसल्याने आणि या मालिकेचाा टाईम स्लॉट ‘अबोली’ या मालिकेने घेतल्याने मालिकेच्या निर्मात्यांनी मालिकेत मोठा ट्विस्ट आणून मालिका रंजक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या दिवसांत मालिकेत अनेक उत्कंठावर्धक प्रसंग,वळणं प्रेक्षकांन पाहायला मिळतील.

मराठी सीरिअल्सच्या अधिकृत अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये याची माहिती देण्यात आली आहे.  
नवीन ट्विस्ट म्हटल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचणं साहजिक आहे.  त्यामुळे आता या मालिकेत नवीन काय घडणार,  मालिकेत नव्या कलाकारांची एंट्री होणार की जुन्याच कलाकारांना घेऊन नवीन वळणं येणार, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.

 देवमाणूस ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत असलेली, सत्यघटनेवर आधारित  मालिका आहे. या मालिकेत किरण गायकवाड, अस्मिता देशमुख, रुक्मिणी सुतार, अंजली जोगळेकर, विरल माने, अंकुश दांडेकर आणि किरण डांगे हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Web Title: zee marathi serial Devmanus 2 Some major Twists To Expect Ahead In The Story