​कोण बनणार बाजीराव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 17:15 IST2016-09-19T11:45:17+5:302016-09-19T17:15:17+5:30

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांची प्रमुख भूमिका असलेला बाजीराव-मस्तानी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता बाजीराव ...

Who will become Bajirao? | ​कोण बनणार बाजीराव?

​कोण बनणार बाजीराव?

पिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांची प्रमुख भूमिका असलेला बाजीराव-मस्तानी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता बाजीराव यांच्या आयुष्यावर लवकरच एक मालिका बनवली जाणार आहे. या मालिकेच्या पहिल्या दृश्याचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. मुर्हूताच्या शॉर्टसाठी या मालिकेची सगळी टीम उपस्थित होती. या मालिकेसाठी काही कलाकारांची निवड करण्यात आली असून काही कलाकारांच्या ऑडिशन्स सुरू आहेत. अभिनेता मनिष वाधवा या मालिकेत एका प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. पण तो कोणती भूमिका साकारणार हे गुलदस्त्यातच आहे. बाजीराव, मस्तानी, काशीबाई कोण असणार हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना काही दिवस वाट पाहावी लागेल. 

Web Title: Who will become Bajirao?