"रिक्षावाल्याची मान धरली अन्..." वंदना गुप्तेंनी सांगितला भन्नाट किस्सा, हसून हसून पुरेवाट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 11:10 AM2023-08-11T11:10:56+5:302023-08-11T11:11:58+5:30

वंदना गुप्तेंनी रिक्षावाल्यालाच शिकवला धडा

vandana gupte marathi actress shared comedy incident in khupte tithe gupte show | "रिक्षावाल्याची मान धरली अन्..." वंदना गुप्तेंनी सांगितला भन्नाट किस्सा, हसून हसून पुरेवाट

"रिक्षावाल्याची मान धरली अन्..." वंदना गुप्तेंनी सांगितला भन्नाट किस्सा, हसून हसून पुरेवाट

googlenewsNext

अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) या त्यांच्या बिन्धास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. भारदस्त आवाज, कधी काय बोलतील याचा नेम नाही असं काहीसं त्यांचं दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. सध्या 'बाईपण भारी देवा' सिनेमामुळे ते पुन्हा एकदा दिसून येतंय. सिनेमातही त्यांची त्यांना शोभेल अशीच भूमिका आहे. वंदना गुप्ते नुकतंच 'खुपते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी एका रिक्षावाल्यासोबतचा किस्सा सांगितला.

अवधूत गुप्तेच्या शोचा आगामी एपिसोड 'गुप्ते तिथे गुप्ते' आहे. कारण वंदना गुप्ते आणि अवधूत गुप्ते यांच्या गप्पा रंगल्या आहेत. वंदना गुप्ते यांनी आपल्या नेहमीच्याच शैलीत गप्पागोष्टी केल्या आहेत. यावेळी त्यांनी त्यांचा गाजलेला रिक्षावाल्यासोबतचा किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, "मी माझ्या गाडीतून एके ठिकाणी चालले होते. तेव्हा मी एका रिक्षावाल्याला ओव्हरटेक केलं. तर त्या रिक्षावाल्याने मला शिवी दिली. मग मी गाडीतून उतरले आणि रिक्षावाल्याला वितारलं,'काय बोलला रे तू?' तो म्हणाला,  'काही नाही'. मग मी म्हटलं,'तू मला शिवी दिली'. मी त्याच्या मानेला धरलं आणि खाली वाकवलं. तो ओरडायला लागला. मी हात झटकले आणि गाडीत बसले, तेवढ्यात सिग्नलही सुटला."

वंदना गुप्तेंचा हा प्रोमो खूपच व्हायरल होतोय. वंदना गुप्तेंचा अंदाज प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडलाय. नुकताच त्यांनी ७१ वा वाढदिवस साजरा केला. मात्र वय हा केवळ आकडाच आहे असं त्यांच्या उत्साहाकडे बघून वाटतं. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहेत. मराठी नाटक आणि 'पछाडलेला','भेट','मातीच्या चुली','बे दुणे साडेचार','लपंडाव' अशा अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.

Web Title: vandana gupte marathi actress shared comedy incident in khupte tithe gupte show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.